राजुरा :-बालविद्या शिक्षण प्रसारक मंडळ राजुरा द्वारा संचालित आदर्श मराठी प्राथमिक विद्यामंदिर तथा आदर्श हायस्कूल राजुरा येथे संस्थेचे अध्यक्ष सतिश धोटे यांच्या हस्ते व आशादेवी मराठी प्राथमिक विद्यामंदिर राजुरा येथे संस्थेचे सचिव भास्करराव येसेकर यांच्या हस्ते गणराज्य दिनाचे ध्वारोहण संपन्न झाले.
Students from Adarsh School gave a varied message on Republic Day.
यावेळी संस्थेचे कोषाध्यक्ष प्रकाश बेजंकिवार, संचालक मधुकरराव जानवे, अविनाश निवलकर, मंगला माकोडे, अल्का सदावर्ते, शाळेचे मुख्याध्यापक नलिनी पिंगे, सारीपुत्र जांभूळकर, दिपक सातपुते, पर्यवेक्षक तथा राष्ट्रीय हरित सेना विभाग प्रमुख बादल बेले, पालक प्रतिनिधी आदींची प्रामुख्याने उपस्थिती होती. यावेळी शाळेतील विद्यार्थिनी शरयू सत्यपाल कातकर हिने स्त्रिभ्रूणहत्या यावर संदेश दिला, पुर्वी राहुल गिरडकर हिने राणी ताराबाई ची वेशभूषा केली, श्रेया विठ्ठल सरनाईक हिने प्लॅस्टिकचा दुष्परिणाम व वापर टाळा यावर संदेश दिला, दक्ष भोज (सैनिक), विराज दहागावकर (भगतसिंग), निर झाडे (डॉ. बाबासाहेब आंबेडकर), अनुष्का निमकर व प्रचीता साळवे( जिजाऊ), सृष्टी गिरसावळे( झाशीची राणी) अश्या विवीध वेशभूषा सादर करून सर्वांचे लक्ष वेधून घेतले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शिक्षीका वैशाली टिपले यांनी केले. आभाप्रदर्शन रोशनी कांबळे यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी स्काऊट-गाईड, राष्ट्रीय हरित सेना, इको क्लब च्या विद्यार्थ्यांनी अथक परिश्रम घेतले.
0 comments:
Post a Comment