राजुरा :-ग्रामपंचायत दहेगाव, जीएमआर वरलक्षमी फाउंडेशन तथा नैसर्गिक पर्यावरण संवर्धन व मानवता विकास संस्था शाखा दहेगाव यांच्या संयुक्त विद्यमानाने महिलांकरिता हळदी कुंकू समारंभाचे आयोजन करण्यात आले होते.
Distribution of pots to women on the occasion of Haldi Kumku in Dahegaon.
यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान युवा सरपंच विशाल नानाजी पारखी यांनी भूषविले तर उद्घाटक म्हणून नेफडो संस्थेचे राज्याध्यक्ष बादल बेले यांची उपस्थिती होती. कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी म्हणून नागपूर विभाग अध्यक्ष विजयकुमार जांभूळकर, संतोष देरकर, बबलू चव्हाण, रवी बुटले, सूनैना तांबेकर, कोरपना तालुका महिला अध्यक्षा उषा टोंगे, उपाध्यक्षा अरूणा सालवटकर, राजुरा तालुका अध्यक्षा मंदा सातपुते, वर्षा कोयचाडे, जीएमआर वरलक्ष्मी फाउंडेशन वरोरा च्या समन्वयक संध्या माकोडे, उपसरपंच महेश सोनटक्के, सदस्य कविता घुगल, चित्रा गोखरे, रुपाली टाले, गायत्री मेश्राम, रंजना वाभिटकर, विशाल डाहुले, सोसायटीचे अध्यक्ष विलास ढगे आदींची उपस्थिती होती. कार्यक्रमाचे सू्त्रसंचालन किशोर साळवे यांनी केले तर प्रास्तावीक जी. प. उच्च प्राथमिक शाळेच्या मुख्याध्यापिका सी.एम. सातपुते यांनी व आभार प्रतीक्षा टाले यांनी मानले. या गावात जनतेमधून दोनदा निवडून आलेले विशाल पारखी हे सरपंच आहेत. जवळपास बावीस सीसीटिव्ही कॅमेरे लावुन संपूर्ण गावात लक्ष ठेवले जाते. स्मशानभूमी मधे व गावात दहा हजार वृक्ष लागवड करून त्यांचे संवर्धन करून नंदनवन तयार केले आहे. अंगणवाडी ISO नामांकन प्राप्त आहे. ग्रामपंचायत इमारत अतीशय सुसज्ज असून त्यालाही ISO नामांकन मिळविण्याचे प्रयत्न सूरू आहे. गावातील कर गोळा करण्यासाठी विवीध उपाययोजनाही राबविल्या त्यात कचराकुंड्या वाटप, साखर वाटप, थकीत कर भरणा केला की पाच किलो साखर दिली जाते, महिलांना सेनेटरी नॅपकिन दिल्या जातात, गाव दारू मुक्त व तंटामुक्त केले. स्मशानभूमीत किर्तन, वाढदिवस, गावात मृतकाच्या घरात पाच पाण्याच्या कॅन व अंतीम यात्रेत पाच अशा दहा पाण्याच्या कॅन मोफत दिल्या जातात. हळदी कुंकू समारंभात शेकडो महिलांना कुंड्याचे वाटप करण्यात आले. विशाल पारखी यांची नुकतीच वरोरा तालुका अध्यक्ष नैसर्गिक पर्यावरण संवर्धन व मानवता विकास संस्थेने निवड केली असूनपर्यावरण संवर्धन व मानवता विकासाचे पवित्र आदर्श कार्य अविरतपने सुरू ठेवण्याचा संकल्प त्यांनी केला आहे.
0 comments:
Post a Comment