चंद्रपुर :-मौजा वायगाव (तु.) येथील जुने गावठाण आबादी मधील ग्रामपंचायत मालमत्ता क्र. २३२ (जुना मालमत्ता क्र. १४६), कुल आराजी २७८.८१ चौ. मी. (३००० फुट) जागा व त्यावर आराजी ४०.९९ चौ. मी. (४४१ चौ. फुट) मालमत्ता माझी वडिलोपार्जीत (गणपत नारायण नवघरे) यांच्या मालकीची होती.
Take action against Maroti Gaikwad, who illegally sold a house by force from an uneducated mother and smuggled sand into the land.
गणपत नारायण नवघरे यांचा दि. १७/५/२०१३ रोजी मृत्यु झाला. मी सरकारी नौकरीत असल्यामुळे मी' चंद्रपूरलाच राहत होती. मला अंधारात ठेवून अनुक्रमे श्रीमती शांताबाई गणपत नवघरे, सुधाकर गणपत नवघरे, प्रभाकर गणपत नवघरे वारसदार असतांना सुध्दा दि. २९/१०/२०१३ रोजी ठराव घेऊन श्रीमती शांताबाई नवघरे यांच्या एकटीच्यानावे करण्यात आली. आई अशिक्षित असल्यामुळे मारोती वामनराव गायकवाड यांनी डाव रचुन घराची ६/१/२०१४ ला दस्तावेज ४१/२०१४ नुसार १ लाख ८५ हजारात खरेदी केली यावर कारवाई करण्यात यावी.
चंद्रपूर येथून मी २०२२ मध्ये सेवानिवृत्त होऊन गावी राहण्याच्या हेतूने गेले असता माझ्या घरावर मारोती वामनराव गायकवाड यांनी कब्जा केला आहे आणि ठिकाणावर अवैधपणे रेती तस्करी व अवैध धंदे राजरोसपणे सुरु आहेत. एवढेच नाहीतर गैरअर्जदार यांच्या शेतालाच लागून असलेल्या दुसऱ्याच्या शेतामधून गेलेला नाल्यावर कमल वामन गायकवाड यांनी अवैध बंधारा बांधला आहे. त्यांची तक्रार पण करण्यात आली व कारवाई मात्र अजून झाली नाही.
वारसदाराना अंधारात ठेवून अशिक्षित आईला बळजबरीने १ लाख ८५ हजारात घराची अवैध खरेदी करणे व त्यावर अवैध धंदे राजरोसपणे करण्याचा राजनीतिक आश्रय असलेला व त्याचा गैरफायदा घेणाऱ्या मारोती गायकवाड यांच्यावर कठोर कारवाई करण्याची मागणी आयोजित पत्रकार परिषदेत त्रस्त मधुकर नवघरे यांनी केली आहे. याची तक्रार जिल्हाधिकारी यांना करण्यात आली आहे.
0 comments:
Post a Comment