सादिक थैम वरोरा: तालुक्यातील मौजा सुर्ला कक्ष क्र.14व मध्ये दिनांक 09/01/2025 रोजी रात्रौ वनकर्मचारी दिपन के. मडावी वनरक्षक सुर्ला व अमोल डी. तिखट वनरक्षक वरोरा, गस्त करीत असतांना आरोपी भाऊराव विठ्ठल सोनुने रा. शेगाव व सुरज मुर्लीधर मोरे, रोहीत अजाब सातघरे रा. सालोरी हे ट्रॅक्टर क्रमांक MH34TC165 ने बामनडोह नाला मधुन अवैधरित्या रेतीची उत्खनन करतांना आढळून आले. सदर रेती सहित ट्रॅक्टर ट्रॉली व इतर साहित्य ताब्यात घेऊन POR No. 09182/229532 दिनांक 09/01/2025 अन्वये वनगुन्हा नोंद करुन वनपरिक्षेत्र कार्यालय वरोरा येथे आणण्यात आले.
Tractor trolley used for illegal sand mining and transportation seized
त्याच रात्री गस्ती दरम्यान नयन रमेश चिंचोलकर यांचे मालकीचे ट्रॅक्टर व ट्रॉली वनविभागाच्या हद्दीतील बामनडोह नाल्यामधुन अवैद्य रित्या रेतीचा उपसा करुन बोरगाव मार्ग वाहतुक करीत असतांना आढळून आले. सदर ट्रॅक्टर व ट्रॉलीस ताब्यात घेवुन वन परिक्षेत्र कार्यालय वरोरा येथे नेत असतांना नागपुर हायवेवरील चिनोरा फाटा जवळ ट्रॅक्टर मालक आरोपी नयन रमेश चिंचोलकर सचिन उईके वाहन चालक व इतर 01 व्यक्ती यांनी हायड्रोलीकच्या सहाय्याने रेतीने भरलेली ट्रॉली रस्त्यावर खाली करत ट्रॅक्टर-ट्रॉली घेवुन पळून गेले. दोन्ही ट्रॅक्टर विरुध्द 1927 कायद्यान्वये वनगुन्हा नोंद करण्यात आला असुन पुढील चौकशी सतिश के. शेंडे, वनपरिक्षेत्र अधिकारी वरोरा यांचे मार्गदर्शनात आर. पी. राठोड क्षे.स. वरोरा, दिपन के. मडावी वनरक्षक सुर्ला, व अमोल डी. तिखट वनरक्षक वरोरा करीत आहे.
ट्रॅक्टर-ट्रॉली घेऊन पळून गेलेला आरोपी नयन रमेश चिंचोलकर, सचिन उईके वाहन चालक व इतर 01 यांच्या विरुध्द वनपरिक्षेत्र अधिकारी एस. के. शेंडे यांनी पोलीस स्टेशन वरोरा येथे तक्रार केली असुन गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
0 comments:
Post a Comment