Ads

वन्यप्राण्याची शिकार करण्याकरीता आलेल्या आरोपींना वनविभागाने केली अटक

भद्रावती जावेद शेख :-मौजा महालगाव (खु.) कक्ष क्र. 2 राखीव वनामध्ये दिनांक 13/02/2025 रोजी रात्रौ 09.30वाजताचे दरम्यान वनकर्मचारी एस. के. शेंडे वपअ वरोरा, डि. बी. चांभारे क्षे.स. टेमुर्डा, जे. के. लोणकर क्षे.स. शेगाव, एस. व्ही. वेदांती वनरक्षक महालगाव, ब्रम्हणाथ वनरक्षक रामपुर, रोजनदारी वनमजुर व पि.आर.टी. टिम गस्त करीत असतांना आरोपी रुपेश धारसिंग दडमल, जयचंद सरबत मालवे, रामा संजय दडमल सर्व राहणार हिरापुर पो. कोसरसार ता. वरोरा, जिल्हा चंद्रपूर व संदिप बालीकचंद्र शेरकुरे रा. धोपटाळा, ता. कोरपना, जिल्हा चंद्रपूर हे कक्ष क्र. 2 राखीव वनामध्ये संक्षयास्पद अवस्थेत आढळुन आले.
Forest Department arrests accused who came to hunt wild animals
त्यांची विचारणा केली असता ते वन्यप्राण्याची शिकार करण्याकरीता आल्याचे सांगितले. त्यांचेकडून शिकारीसाठी वापरण्यात येणारे साहित्य वाघुर, लोखंडी भाला, नायलॉन दोरी, दुचाकी वाहन, मोबाईल जप्त करण्यात आलेले असुन त्यांचावर भारतीय वन्यजीव (संरक्षण) अधिनियम 1972 चे कलम 9, 39, 2(16) व 51 अन्वये वनगुन्हा नोंद करुन आरोपींना त्याब्यात घेऊन कोर्ड विद्यमान प्रथम श्रेणी न्यायलय वरोरा येथे दिनांक 14/02/2025 रोजी हजर करण्यात आले.

पुढील चौकशी व्हि. श्री. तरसे सहाय्यक वनसंरक्षक (तेंदु), चंद्रपूर वनविभाग, चंद्रपूर यांचे मार्गदर्शनात सतिश के. शेंडे, वनपरिक्षेत्र अधिकारी वरोरा डि. बी. चांभारे क्षे.स. टेमुर्डा, जे. के. लोणकर क्षे.स. शेगाव, एस. व्हि. वेदांती वनरक्षक महालगाव, करकाडे, केजकर, ब्रम्हनाथ वनरक्षक करीत आहे.
Share on Whatsapp

About The Chandrapur Times

यह पोर्टल संपादक, मालिक, प्रकाशक राजेश सनमाहेन सोलापनद्वारा कार्यालय साप्ताहिक दि चंद्रपुर टाइम्स, आक्केवार वाडी, वॉर्ड नं. १, चंद्रपुर, से प्रकाशित किया गया है । प्रकाशित किसी भी लेखन सामग्री पर संपादक सहमत ही हो यह आवश्यक नही । प्रकाशित कि सी भी लेखनपर आपत्ती हाने पर उनका निस्तारण सूचना प्रौद्योगिकी (प्लेटफ़ॉर्म दिशानिर्देश और डिजिटल मीडिया आचार संहिता) विनियम 2021 के तहत किया जायेगा ।

0 comments:

Post a Comment