Ads

स्थानिक गुन्हे शाखा, चंद्रपूर ची अवैध सट्टा-पट्टी जुगार चालविणारे तसेच मादक पदार्थ विक्री व सेवन करणाऱ्यांविरूध्द धडक कार्यवाही

चंद्रपूर :-चंद्रपूर जिल्हयातील अवैध सट्टा - पट्टी चालविणारे व जुगार खेळणारे तसेच गांजा विकी व सेवन करणाऱ्यांवर आळा घालण्याबाबत चंद्रपूर जिल्हयाचे पोलीस अधिक्षक मुमक्का सुदर्शन सा. चंद्रपूर यांनी संपूर्ण पोलीस ठाणे प्रभारी व स्थानिक गुन्हे शाखा यांना निर्देशित केले होते.
Local Crime Branch, Chandrapur takes strict action against those running illegal betting and gambling as well as those selling and consuming drugs
त्या अनुषंगाने स्थानिक गुन्हे शाखेचे वेगवेगळे पथकांनी आठवडाभरात संपूर्ण जिल्हयांतर्गत अवैध सट्टा पट्टी चालविणाऱ्यांवर आळा घालणेकरिता मोहीम राबवून पो. स्टे. चिमूर अंतर्गत ०२, पो.स्टे. मूल अंतर्गत ०२, पो.स्टे. माजरी, चंद्रपूर शहर, दुर्गापूर अंतर्गत प्रत्येकी ०१ आरोपी तसेच पो.स्टे. कोरपना अंतर्गत शंकरपटात झेंडी-मुंडी जुगार खेळ चालवित असलेल्या ०१ आरोपीविरूध्द आणि पो.स्टे. रामनगर अंर्तगत जुगार खेळणाऱ्या ०५ आरोपी असे १३ जणांविरूध्द धडक कारवाई करत ३१,४४०/- रू. चा मुददेमाल जप्त करून संबंधित पोलीस स्टेशनला महाराष्ट्र जुगार अधिनियम अंतर्गत गुन्हे नोंद करण्यात आलेले आहेत.

त्याचप्रमाणे पो.स्टे. बल्लारपूर अंतर्गत ०१ आरोपीस विकी करण्याकरीता दुचाकीने गांजा वाहतुक करतांना पकडून त्याचेविरूध्द एनडीपीएस अॅक्ट अंतर्गत कारवाई करत त्याचेंकडून ५ कि.ग्रॅ. गांजा व दुचाकी असा एकुण १,८२,०००/- रू. चा मुद्देमाल जप्त केले. तसेच पोस्टे रामनगर, सावली, वरोरा, बल्लारपूर, भद्रावती, चंद्रपूर शहर अंतर्गत गांजा सेवन करणाऱ्या १२ आरोपीतांविरूध्द एनडीपीएस अॅक्ट अंतर्गत गुन्हे नोंद करण्यात आलेले आहेत.

सदरची कार्यवाही मा. पोलीस अधिक्षक श्री. मुमक्का सुदर्शन सा. चंद्रपूर, मा. अपर पोलीस अधिक्षक रिना जनबंधु मॅडम, यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक महेश कोंडावार स्थानिक गुन्हे शाखा चंद्रपूर, तसेच स्थानिक गुन्हे शाखेचे अधिकारी व अंमलदार यांचे वेगवेगळया पथकांनी केली.

मा. पोलीस अधिक्षक चंद्रपूर यांचेकडून संपूर्ण चंद्रपूर जिल्हयातील जनतेला आवाहन करण्यात येते की, त्यांनी आपापले परिसरातील अवैध जुगार तसेच अवैध मादक पदार्थ विकी व सेवन करणा-यांबाबत माहीती पोलीस नियंत्रण कक्ष तसेच डायल ११२ या क्रमांकावर कळवावी.
Share on Whatsapp

About The Chandrapur Times

यह पोर्टल संपादक, मालिक, प्रकाशक राजेश सनमाहेन सोलापनद्वारा कार्यालय साप्ताहिक दि चंद्रपुर टाइम्स, आक्केवार वाडी, वॉर्ड नं. १, चंद्रपुर, से प्रकाशित किया गया है । प्रकाशित किसी भी लेखन सामग्री पर संपादक सहमत ही हो यह आवश्यक नही । प्रकाशित कि सी भी लेखनपर आपत्ती हाने पर उनका निस्तारण सूचना प्रौद्योगिकी (प्लेटफ़ॉर्म दिशानिर्देश और डिजिटल मीडिया आचार संहिता) विनियम 2021 के तहत किया जायेगा ।

0 comments:

Post a Comment