भद्रावती (तालुका प्रतिनिधी) जावेद शेख:-शहरातील जेष्ठ नागरिक भवन येथे ह्रदयरोग तपासणी शिबीर दि. 23फेब्रुवारीला केंद्रीय सेवानिवृत्त कर्मचारी संघ व जेष्ठ नागरिक संघ भद्रावती आणि स्पंदन हार्ट इंस्टिट्यूट, नागपूर यांच्या सौजन्याने राबविण्यात आले. या शिबीरात एकुण १२५ पुरूष, महिलांची बी.पी., शुगर, इ.सी.जी. करण्यात आली.
या कार्यक्रमाला यशस्वी करण्यासाठी स्पंदन हार्ट इंस्टिट्यूट, नागपूरचे प्रबंधक संदिप जग्गी, विक्रम खाडवेकर, डॉ. पुजा मारू, डॉ. श्रद्धा झबरे आणि चमू तसेच वामन नामपल्लीवार, मनोहर साळवे,
अन्ना कुटेमाटे, बाळा कुटेमाटे, सुरेश चिटमलवार, काशीराम मनघटे, मोहनदास देशमुख, मोहन पवार यांनी मोलाची कामगिरी केली.
0 comments:
Post a Comment