Ads

राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या भजनाने निनादले चुनाळावासीयं..

राजुरा : तालुक्यातील चुनाळा येथे श्रीगुरूदेव सेवा मंडळ व शिव जयंती उत्सव समिती कडून विदर्भ स्तरीय भव्य खंजेरी भजन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. 17 ते 19 फेब्रुवारी पर्यंत चाललेल्या या स्पर्धेत अनेक नामवंत भजन मंडळांनी सहभाग नोंदविला.
The people of Chunal were moved by the hymns of national saint Tukadoji Maharaj.
भजन स्पर्धेसह छत्रपती शिवाजी महाराज जयंती पर्वावर तालुका स्तरीय शिव व्याख्यान स्पर्धा व युवा व्याख्याते महेश निवृत्ती महाले यांचे प्रबोधनात्मक जाहीर शिव व्याख्यानाचे ही आयोजन करण्यात आले. प्रसंगी गावकऱ्यांनी भरभरून प्रतीसाद दिला. यावेळी राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या भजनाने चुनाळा ग्राम निनादले होते.
आयोजक ग्राम पंचायत सदस्य रविंद्र अर्जुन गायकवाड यांच्या संकल्पनेतून या स्पर्धांचे दरवर्षी आयोजन करण्यात येत असते. या तिन दिवस चाललेल्या स्पर्धांमध्ये भजन स्पर्धेत विदर्भातील 30 भजन मंडळांनी सहभाग नोंदविला. स्पर्धेत उत्कृष्ठ तबला वादक, उत्कृष्ठ हार्मोनियम वादक, उत्कृष्ठ गायक, उत्कृष्ठ खंजेरी वादक यासाठी वैयक्तीक बक्षीस ठेवण्यात आली होती. तर तालुका स्तरीय शिव व्याख्यान स्पर्धेत 25 स्पर्धकांनी सहभाग नोंदवित आपल्या कलाकौशल्याने उपस्थितांना मंत्रमुग्ध केले.
कार्यक्रमाचे उद्घाटक म्हणून माजी आमदार ॲड. संजय धोटे, प्रमुख पाहूने माजी जि.प. सदस्य अविनाश जाधव, भाजपा जिल्हा उपाध्यक्ष सतीश धोटे, कृ.उ.बा. समीतीचे उपसभापती संजय पावडे, सरपंच बाळनाथ वडस्कर, गुरुदेव सेवा मंडळाचे सदस्य ॲड. राजेंद्र जेणेकर, लटारु मत्ते आदींची यावेळी प्रामुख्याने उपस्थिती होती.
छत्रपती शिवाजी महाराज जयंती निमीत्त युवा व्याख्याते महेश निवृत्ती महाले यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांचे जीवनचरीत्रावर प्रकाश टाकला. गावकऱ्यांनी स्पर्धा व आयोजीत कार्यक्रमाला भरगच्च हजेरी लावून कार्यक्रमाचा मनमुराद आनंद घेतला. ग्रा.पं. सदस्य रवींद्र गायकवाड यांच्या संकल्पनेतून आयोजीत कार्यक्रमास बंडूजी भगत, वैभव माणूसमारे, सत्यपाल निमकर, गजानन हेपट, कमलेश वांढरे, अनिल तामटकर, रंजीत डाखरे, प्रेम मेश्राम, रवी वांढरे,‍ सरिता प्रकाश हेपट, मनिषा सत्यपाल निखाडे, देवराव देवाळकर, अभय माणुसमारे, स्वप्नील निखाडे, सुरेश आस्वले,‍ मनिष कायरकर, रामदास साळवे, बंडू निमकर, बंडू शुंभ, अजय श्रीवेदी, अरुण पिंगे, जगदिश वांढरे, अरूण राजुरकर, शंकर तपासे, मारोती धुर्वे, राहूल निमकर, कल्पेश माणुसमारे यांच्यासह अनेक सदस्यांनी अथक योगदान दिले.
Share on Whatsapp

About The Chandrapur Times

यह पोर्टल संपादक, मालिक, प्रकाशक राजेश सनमाहेन सोलापनद्वारा कार्यालय साप्ताहिक दि चंद्रपुर टाइम्स, आक्केवार वाडी, वॉर्ड नं. १, चंद्रपुर, से प्रकाशित किया गया है । प्रकाशित किसी भी लेखन सामग्री पर संपादक सहमत ही हो यह आवश्यक नही । प्रकाशित कि सी भी लेखनपर आपत्ती हाने पर उनका निस्तारण सूचना प्रौद्योगिकी (प्लेटफ़ॉर्म दिशानिर्देश और डिजिटल मीडिया आचार संहिता) विनियम 2021 के तहत किया जायेगा ।

0 comments:

Post a Comment