Ads

देशाला सशक्त युवकांची आवश्यता - हंसराज अहिर

चंद्रपूर : विद्यार्थी दशेमध्ये अभ्यासाबरोबरच मैदानी खेळ महत्त्वाचा आहे. खेळामुळे माणसाचे मन आणि शरीर सशक्त होत असते. देशाच्या विविधांगी प्रगतीसाठी आज सशक्त युवकांची आवश्यकता असल्याचे प्रतिपादन, भारत सरकारच्या इतर मागासवर्गीय आयोगाचे अध्यक्ष हंसराज अहिर यांनी केले. गोंडवाना विद्यापीठातर्फे आयोजित 26 व्या महाराष्ट्र राज्य आंतर विद्यापीठ क्रीडा महोत्सवाच्या पारितोषिक वितरण व समारोप प्रसंगी ते प्रमुख अतिथी म्हणून बोलत होते.
The country needs strong youth - Hansraj Ahir
यावेळी मान्यवरांच्या हस्ते विजयी संघाना पारितोषिक देऊन सन्मानित करण्यात आले. यामध्ये सर्व क्रीडा प्रकारातील सर्वसाधारण विजेतेपद मुंबई विद्यापीठाला तर उपविजेतेपद सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाला मिळाले. उत्कृष्ट पथसंचलनासाठी महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाला पारितोषिक प्राप्त झाले.
याप्रसंगी व्यासपीठावर विधान परिषदेचे सदस्य सुधाकर अडबाले, कुलगुरू डॉ. प्रशान्त बोकारे, प्र-कुलगुरू डॉ. श्रीराम कावळे, कुलसचिव डॉ. अनिल हिरेखण, व्यवस्थापन परिषदेचे सदस्य प्रशांत मोहिते, गुरुदास कामडी, प्रशांत दोंतुलवार, अधिष्ठाता जयेश चक्रवर्ती, अधिष्ठाता डॉ. संजय निंबाळकर, अधिसभा सदस्य प्राचार्य राजेश दहेगावकर, डॉ. मिलींद भगत, दिपक धोपटे, क्रीडा महोत्सवाचे समन्वयक डॉ. श्याम खंडारे, डॉ. अनिता लोखंडे, परीक्षा व मुल्यमापन मंडळाचे संचालक डॉ. प्रवीण पोटदुखे यांच्यासह राजभवनद्वारा नियुक्त निरीक्षण समिती आणि वित्त व लेखा समितीचे सदस्य डॉ. भास्कर माने, डॉ. मनोज रेड्डी, डॉ. अरुण माने उपस्थित होते.
श्री. अहिर म्हणाले, कबड्डी, खो-खो हे मैदानी खेळ महाराष्ट्राचे भूषण असून या क्रीडा स्पर्धांमध्ये या खेळांचा समावेश असल्याने त्याचा अभिमान वाटतो. खेळाडूंसाठी भारत सरकार शिष्यवृत्तीसह विविध योजना राबवित असून यामुळे निश्चितच एक सशक्त व धैर्यवान युवापिढी तयार होईल. आज व्यायाम व योगाची अत्यंत आवश्यकता असल्याचे सांगून त्यांनी स्पर्धांमधील यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.
श्री. अडबाले म्हणाले, गोंडवाना विद्यापीठाची होत असलेली विकासात्मक वाटचाल निश्चितच उल्लेखनीय आहे. सदर महोत्सवाचे शिवधनुष्य विद्यापीठाने अत्यंत लिलया पेलले असल्याचे नमूद करुन दिवसेंदिवस विद्यापीठ यशशिखरे पादाक्रांत करीत राहो अशी आशाही त्यांनी यावेळी व्यक्त केली.
अध्यक्षीय भाषणात डॉ. बोकारे म्हणाले, मैदानी खेळांमध्ये खेळाडूंनी अतुलनीय धैर्य दाखविले. खिलाडूवृत्तीमधून तयार झालेले नेतृत्व कधीही हार मानत नाही. हा महोत्सव म्हणजे देशाचे भावी नेतृत्व तयार करणारा क्रीडा महोत्सव आहे.
पुढील वर्षीचे यजमानपद असलेल्या स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ, नांदेड यांच्याकडे कुलगुरु डॉ. प्रशान्त बोकारे यांनी ध्वजहस्तांतरण केले.
प्रास्ताविक प्र-कुलगुरु डॉ. श्रीराम कावळे यांनी केले. सूत्रसंचालन डॉ. प्रशांत ठाकरे व डॉ. नंदु पाटील यांनी केले तर आभार कुलसचिव डॉ. अनिल हिरेखण यांनी मानले.
यावेळी सहभागी विद्यापीठांचे क्रीडा संचालक, संघ व्यवस्थापक, प्रशिक्षक, पंच, निमंत्रित मान्यवर, प्राध्यापक, खेळाडू विद्यार्थी, कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
मुंबई विद्यापीठाला मिळाले सर्वसाधारण विजेतेपद तर
उपविजेतेपदी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ.
26 व्या महाराष्ट्र राज्य आंतर विद्यापीठ क्रीडा महोत्सव 2024 चे सर्व क्रीडा प्रकारातील सर्वसाधारण विजेतेपद मुंबई विद्यापीठाला तर उपविजेतेपद सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाला मिळाले. सांघिक विभागाच्या पुरुष व महिला गटातील सर्वसाधारण विजेतेपद मुंबई विद्यापीठाला मिळाले. शिवाजी विद्यापीठ, मुंबई विद्यापीठ, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ यांना ॲथलेटिक्स मधील पुरुष गटातील अनुक्रमे प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांकाचे सर्वसाधारण विजेतेपद मिळाले. तर महिला गटातील सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, मुंबई विद्यापीठ तर राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ यांना अनुक्रमे प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांकाचे सर्वसाधारण विजेतेपद मिळाले. उत्कृष्ट पथसंचलनासाठी महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाला पारितोषिक प्राप्त झाले.
स्पर्धेमधील विजेत्या विद्यापीठांचा तपशिल पुढीलप्रमाणे:
कबड्डी पुरुष गट: सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ (प्रथम), मुंबई विद्यापीठ, मुंबई (द्वितीय), डॉ. होमीभाभा ‍विद्यापीठ, मुंबई (तृतीय)
कबड्डी महिला गट: मुंबई विद्यापीठ, मुंबई (प्रथम), एसएनडीटी विद्यापीठ, मुंबई (द्वितीय), शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर (तृतीय)
खो-खो पुरुष गट: स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा, विद्यापीठ नांदेड (प्रथम), डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, छत्रपती संभाजीनगर (द्वितीय), मुंबई विद्यापीठ, मुंबई (तृतीय)

खो-खो महिला गट:
मुंबई विद्यापीठ, मुंबई (प्रथम), एसएनडीटी, विद्यापीठ, मुंबई (द्वितीय), सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ (तृतीय)  
व्हॉलीबॉल  पुरुष गट: डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ (प्रथम), सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ (द्वितीय), कर्मवीर भाऊराव पाटील, विद्यापीठ, सातारा (तृतीय)  
व्हॉलीबॉल  महिला गट: सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ (प्रथम), एसएनडीटी, विद्यापीठ, मुंबई (द्वितीय), मुंबई विद्यापीठ, मुंबई (तृतीय)
बास्केटबॉल पुरुष गट: सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ (प्रथम), मुंबई विद्यापीठ, मुंबई (द्वितीय), डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ (तृतीय)
बास्केटबॉल महिला  गट: राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ (प्रथम), शिवाजी विद्यापीठ (द्वितीय), मुंबई विद्यापीठ, मुंबई (तृतीय)
बुध्दीबळ पुरुष  गट: मुंबई विद्यापीठ, मुंबई (प्रथम), सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ (द्वितीय), राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ (तृतीय)
बुध्दीबळ महिला गट: डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ (प्रथम), मुंबई विद्यापीठ, मुंबई (द्वितीय), महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ (तृतीय)
टेबल टेनिस पुरुष  गट: स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ (प्रथम), शिवाजी विद्यापीठ  (द्वितीय), राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ (तृतीय)
टेबल टेनिस महिला  गट: मुंबई विद्यापीठ, मुंबई (प्रथम), एसएनडीटी विद्यापीठ  (द्वितीय), सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ (तृतीय)
बॅडमिंटन पुरुष गट: मुंबई विद्यापीठ, मुंबई (प्रथम), डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ (द्वितीय), सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ (तृतीय)
बॅडमिंटन महिला गट: सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ (प्रथम), राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ (द्वितीय), शिवाजी विद्यापीठ (तृतीय)

ॲथलेटीक्स:100 मीटर (महिला)
सुवर्ण पदक: गौरी नाईक, सावित्रीबाई फुले विद्यापीठ, पुणे 
रौप्य पदक: चारवी पुजारी, मुंबई विद्यापीठ, मुंबई 
कास्य पदक: तितिक्षा पाटोळे,  शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर 

200 मीटर सुवर्ण पदक: 
चारावी पुजारी, मुंबई विद्यापीठ,मुंबई 
रौप्य पदक: तितिक्षा पाटोळे, शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर
कास्य पदक: गौरी नाईक, सावित्रीबाई फुले विद्यापीठ, पुणे 

400 मीटर सुवर्ण पदक: 
नेहा धाबले, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज, नागपूर विद्यापीठ ,नागपूर
रौप्य पदक, आर्या कोरे, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज, नागपूर विद्यापीठ ,नागपूर
कास्य पदक: लीना कुरे, मुंबई विद्यापीठ,मुंबई 
800 मीटर सुवर्ण पदक: 
शेवंता पवार, सावित्रीबाई फुले विद्यापीठ, पुणे 
रौप्य पदक: आर्या कोरे, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज, नागपूर विद्यापीठ ,नागपूर
कास्य पदक: अदिती पाटील, मुंबई विद्यापीठ,मुंबई

1500 मीटर सुवर्ण पदक: 
मिताली भोयर,  राष्ट्रसंत तुकडोजी महाराज, नागपूर विद्यापीठ ,नागपूर
रौप्य पदक: रविना गायकवाड , सावित्रीबाई फुले विद्यापीठ, पुणे 
कास्य पदक: तेजस्विनी लांबकणे,राष्ट्रसंत तुकडोजी महाराज, नागपूर विद्यापीठ ,नागपूर

5000 मीटर सुवर्ण पदक:
रिंकी पावरा, कवयित्री बहिणाबाई चौधरी मराठवाडा विद्यापीठ,जळगाव
रौप्य पदक: तेजस्विनी लांबकणे, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज, नागपूर विद्यापीठ ,नागपूर
कास्य पदक: मिताली भोयर, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज, नागपूर विद्यापीठ ,नागपूर

4x400 मीटर रिले सुवर्ण पदक: 
मुंबई विद्यापीठ, मुंबई 
रौप्य पदक, शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर 
कास्य पदक: सावित्रीबाई फुले विद्यापीठ, पुणे

100 मीटर पुरुष सुवर्ण पदक:  
रुषी प्रसाद देसाई, शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर 
रौप्य पदक:  हर्ष राऊत, अहिल्यादेवी होकार विद्यापीठ सोलापूर
कास्य पदक: आदर्श बुरे, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज विद्यापीठ नागपूर
 
200 मीटर सुवर्ण पदक: 
हर्ष राऊत, सोलापर विद्यापीठ सोलापूर
रौप्य पदक: कौशिक कामत, मुंबई विद्यापीठ मुंबई
कास्य पदक: निखिल ढाके, मुंबई विद्यापीठ मुंबई 
 400 मीटर सुवर्ण पदक:
निखिल ढाके, मुंबई विद्यापीठ मुंबई 
रौप्य पदक: विश्वजित शिंदे, सावित्रीबाई फुले विद्यापीठ पुणे
कास्य पदक:  शंकर जराडे, संत गाडगे बाबा विद्यापीठ अमरावती

800 मीटर 
सुवर्ण पदक: तुषार सूर्यवंशी, कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर विद्यापीठ जळगाव
रौप्य पदक: अर्जुन शिंदे, डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ संभाजीनगर 
कास्य पदक: आशुतोष बावणे, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज विद्यापीठ, नागपूर

1500 मीटर
सुवर्ण पदक: गौरव खोडतकर,  राष्ट्रसंत तुकडोजी महाराज विद्यापीठ नागपूर
रौप्य पदक: ओम फाड, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ,पुणे
कास्य पदक: गणेश आठवले, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ,पुणे

5000 मीटर सुवर्ण पदक: राज तिवारी, मुंबई विद्यापीठ, मुंबई
रौप्य पदक: किशोर मारकड, डॉ. बाबासाहेब मराठवाडा विद्यापीठ, संभाजीनगर
कास्य पदक: बबलु  चव्हाण, सोलापूर विद्यापीठ,सोलापूर

4x100 रिले सुवर्ण पदक: शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर
रौप्य पदक: मुंबई विद्यापीठ, मुंबई 
कास्य पदक: पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ, सोलापूर

400 रिले सुवर्ण पदक: मुंबई विद्यापीठ, मुंबई 
रौप्य पदक: शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर 
कास्य पदक: कवियित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ,जळगाव

4x400 रिले सुवर्ण पदक: राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर
रौप्य पदक: मुंबई विद्यापीठ मुंबई
कास्य पदक:  शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर

शॉटपुट सुवर्ण पदक: हंसिका विनीत वसु,  एच एस एन सी विद्यापीठ मुंबई
रौप्य पदक: अग्रता महेश मेळकुंडे: मुंबई विद्यापीठ,मुंबई 
कास्य पदक: किरण कुमार नायर : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ,पुणे

भालाफेक सुवर्ण पदक: सृष्टी सिंह, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ,पुणे
रौप्य पदक: सुरेखा वाढई , डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ 
कास्य पदक: हंसिका वासू,  एच एस एन सी विद्यापीठ मुंबई
डिस्कस थ्रो (थाळी फेक)सुवर्ण पदक: निकिता शेवले, शिवाजी विद्यापीठ,कोल्हापूर 
रौप्य पदक: आयेशा नसीम, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज विद्यापीठ, नागपूर 
कास्य पदक,  प्रियंवदा पाटील,  डॉ.बाबासाहेब आंबेडकर तंत्रज्ञान विद्यापीठ,लोणेरे
उंच उडी सुवर्ण पदक: समीक्षा अडसुळे, शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर 
रौप्य पदक: सुजाता बाबर,  सोलापूर विद्यापीठ
कास्य पदक: आकांक्षा जगताप,  सावित्रीबाई फुले विद्यापीठ, पुणे 

ट्रिपल जंप सुवर्ण पदक: कल्पना मेदकामी, डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ
रौप्य पदक: प्रणिता जाधावार,  पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर विद्यापीठ,सोलापूर 
कास्‍य पदक: मधुरा खांबे, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ,पुणे 

लांब उडी सुवर्ण पदक: स्वाती युइके, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज विद्यापीठ, नागपूर 
रौप्य पदक: कल्पना मेडकामी, डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ
कास्य पदक: अपूर्वा बोधे,  कवयित्री बहिणाबाई चौधरी विद्यापीठ,जळगाव

गोळा फेक (shot put) (पुरुष)  
सुवर्ण पदक  : प्रविणकुमार गुप्ता, मुंबई विद्यापीठ
रौप्य पदक   : ऋषिकेश साखरे, कोल्हापूर विद्यापीठ, कोल्हापूर
कास्य पदक : प्रफुल्ल थोरात, कोल्हापूर विद्यापीठ, कोल्हापूर

लांब उडी (long jump) (पुरुष)
सुवर्ण पदक :महेश जाधव (कर्मवीर भाऊसाहेब पाटील, सातारा विद्यापीठ)
रौप्य पदक  : भूषण शिंदे, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, पुणे
कास्य पदक : सुमेध काळे, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज, नागपूर विद्यापीठ

उंच उडी (high jump) पुरुष 
सुवर्ण पदक  : धैर्यशील गायकवाड, शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर
रौप्य पदक  : अथर्व धज, कोल्हापूर विद्यापीठ, कोल्हापूर
कास्य पदक  : ऋषिकेश डोमिस , सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, पुणे

ट्रिपल जम्प, पुरुष
सुवर्ण पदक : भूषण शिंदे, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, पुणे
रौप्य पदक  : तांबोळी अली शबीर असलम, यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ, नाशिक
Share on Whatsapp

About The Chandrapur Times

यह पोर्टल संपादक, मालिक, प्रकाशक राजेश सनमाहेन सोलापनद्वारा कार्यालय साप्ताहिक दि चंद्रपुर टाइम्स, आक्केवार वाडी, वॉर्ड नं. १, चंद्रपुर, से प्रकाशित किया गया है । प्रकाशित किसी भी लेखन सामग्री पर संपादक सहमत ही हो यह आवश्यक नही । प्रकाशित कि सी भी लेखनपर आपत्ती हाने पर उनका निस्तारण सूचना प्रौद्योगिकी (प्लेटफ़ॉर्म दिशानिर्देश और डिजिटल मीडिया आचार संहिता) विनियम 2021 के तहत किया जायेगा ।

0 comments:

Post a Comment