जावेद शेख भद्रावती प्रतिनिधी :-घरातील व्यक्ती एका खोलीत झोपले असता अज्ञात चोरट्यांनी घरात प्रवेश करून दुसऱ्या खोलीतआलमारीत ठेवलेली बारा हजार रुपयाची रक्कम लांबविल्याची घटना शहरातील जवळे प्लॉट येथे दिनांक 23 रोज रविवारला मध्यरात्रीनंतर घडली.
Unknown thieves robbed a house and stole Rs. 12,000.
सदर चोरीची तक्रार घर मालकाने भद्रावती पोलिसात केली असून भद्रावती पोलिसांनी घटनेचा पंचनामा करून चोरीचा तपास सुरू केला आहे.जवळे प्लॉट येथील अमोल प्रभाकर अनमलवार हे आई वडील बाहेरगावी गेल्यामुळे एका खोलीत झोपले असता अज्ञात चोरट्यांनी दार फोडून घरात प्रवेश केला व दुसऱ्या खोलीत असलेल्या अलमारीत ठेवलेले 12 हजार रुपये लांबविले. अमोल अनमलवार यांना रात्रोला जाग आल्यानंतर त्यांना कपाटातील सामान अस्ताव्यस्त पसरल्याचे दिसले त्यामुळे ही घटना उघडकीस आली. सध्या शहरातील चोरींच्या घटनेत वाढ झाली असून नव्यानेच रुजू झालेल्या ठाणेदारांपुढे या चोरट्यांनी एक प्रकारचे आव्हान उभे केले आहे .अज्ञात चोरट्यांचा शोध भद्रावती पोलिसांनी घेणे सुरू केले आहे.
0 comments:
Post a Comment