भद्रावती जावेद शेख :-अखिल भारतीय ग्राहक पंचायत भद्रावतीकडून मागील काही दिवसापासून शहरात 'ग्राहक आरोग्य जागरुकता मोहिम' राबविली जात आहे. या मोहिमे अंतर्गत शहरातील सर्व खाद्य (अन्न) पदार्थ विकणाऱ्या हॉटेल ची तपासणी करण्यात आली होती. तपासणी दरम्यान अनेक समस्या आढळून आल्या ज्या ग्राहकांच्या आरोग्यासाठी हानिकारक असल्याचे निष्पन्न झाले. त्यामुळे अखिल भारतीय ग्राहक पंचायत भद्रावती आणि अन्न व औषध प्रशासन, चंद्रपूर यांच्या संयुक्त विद्यमाने याच मोहिमे अंतर्गत दि.२४ फेब्रुवारी रोज सोमवार ला सकाळी ठिक १०.३० वाजता, समाज भवन, डॉ. मिलमिले हॉस्पिटल मागे, भद्रावती येथे ग्राहक आरोग्य जागरुकता मार्गदर्शन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
Guidance for food professionals on February 24 in Bhadravati
यामध्ये शहरातील सर्व खाद्य (अन्न) पदार्थ विक्रेते तथा हॉटेल व्यावसायिकांना ग्राहक आरोग्य, स्वच्छता, कायदा, नियम, तसेच ग्राहक आरोग्यावर होणारे परिणाम याबाबत मार्गदर्शन होणार आहे. या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे तसेच मार्गदर्शक म्हणून प्रवीण उमप, सहायक आयुक्त, अन्न व औषध प्रशासन, चंद्रपूर, राजेश भांडारकर, तहसीलदार भद्रावती, डॉ. विशाखा शेळकी, मुख्याधिकारी नगरपरिषद भद्रावती, गिरीश सातरकर, अन्न सुरक्षा अधिकारी, चंद्रपूर, डॉ. आशीष देवतळे, वैद्यकीय अधिकारी, नागरी प्राथमिक आरोग्य केंद्र, भद्रावती तसेच भद्रावती शहरातील संपूर्ण खाद्य (अन्न) पदार्थ विक्रेते, हॉटेल व्यवसायिक, अखिल भारतीय ग्राहक पंचायत चे सदस्य, पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहेत. या मार्गदर्शन कार्यक्रमाचा लाभ भद्रावती शहरातील सर्व खाद्य (अन्न) पदार्थ विक्रेते, हॉटेल व्यावसायिकांनी घ्यावा असे आवाहन अखिल भारतीय ग्राहक पंचायत कडून करण्यात आले आहे.
0 comments:
Post a Comment