Ads

वरोराच्या ग्रामीण भागात स्थळ चित्रपटाचे चित्रीकरण

सादिक थैम वरोरा:ग्रामीण भागातील मुलींच्या लग्नाची रंजक गोष्ट " स्थळ "या चित्रपटातून मांडण्यात आली असून हा चित्रपट येत्या सात मार्चपासून सर्वत्र प्रसिद्ध होत आहे.
Filming location in the rural area of ​​Warora
या चित्रपटाच्या प्रमोशनसाठी चित्रपट अभिनेते व दिग्दर्शक सचिन पिळगावकर यांनी वरोरा शहरात 21 फरवरी रोज शुक्रवारला चित्रपटातील कलाकारांसह येथील डोंगरवार चौकातून रॅलीचे आयोजन केले होते. ही रॅली शहरातील प्रमुख मार्गावरून काढण्यात आली.
वरोरा तालुक्यातील डोंगरगाव ( रेल्वे )या ग्रामीण भागातील गावात या चित्रपटाचे चित्रण करण्यात आले आहे.
अरेंज मॅरेज या संकल्पनेवर चित्रपटात अनोखी गोष्ट दाखवण्यात आली आहे. ग्रामीण भागात राहणारी व स्पर्धा परीक्षा देऊन अधिकारी होण्याचे स्वप्न बघणारी तरुणी आणि तिचे लग्न यावर हा चित्रपट आधारित आहे.
अभिनेते सचिन पिळगावकर यांची ही प्रस्तुती असून जयंत दिगंबर सोमलकर, शेफाली भूषण, करण ग्रोवर,रिंगा मल्होत्रा यांनी " स्थळ " या चित्रपटाची निर्मिती केली आहे.
‌ या चित्रपटात नंदिनी चिकटे, तारणात खिरटकर, संगीता सोनेकर ,सुयोग ढवस,संदीप सोमलकर,संदीप पारखी ,स्वाती उलमाले, गौरी बदकी,मानसी पवार या कलाकारांचा या चित्रपटात समावेश आहे.
Share on Whatsapp

About The Chandrapur Times

यह पोर्टल संपादक, मालिक, प्रकाशक राजेश सनमाहेन सोलापनद्वारा कार्यालय साप्ताहिक दि चंद्रपुर टाइम्स, आक्केवार वाडी, वॉर्ड नं. १, चंद्रपुर, से प्रकाशित किया गया है । प्रकाशित किसी भी लेखन सामग्री पर संपादक सहमत ही हो यह आवश्यक नही । प्रकाशित कि सी भी लेखनपर आपत्ती हाने पर उनका निस्तारण सूचना प्रौद्योगिकी (प्लेटफ़ॉर्म दिशानिर्देश और डिजिटल मीडिया आचार संहिता) विनियम 2021 के तहत किया जायेगा ।

0 comments:

Post a Comment