Ads

धुमनखेडा येथे गोठ्यात शिरून बिबट्याचा धुमाकूळ

सिंदेवाही:- सिंदेवाही वनपरिक्षेत्रातील नवरगाव उपवनक्षेत्रातील धुमनखेड़ा येथील नरेंद्र मेश्राम यांच्या गोठ्यात बिबट शिरला. या बिबट्याने वनरक्षकासह गावातील 4 लोकांना जखमी केले. ही घटना शनिवार (दि.8) दुपारी 3 वाजता घडली. अनेक प्रयत्नांच्या शर्थीनंतर अखेर सायंकाळी 7.30 वाजता बिबट्‌याला रेस्क्यू करण्यात वनविभागाला यश आले.
Leopard enters cowshed in Dhumankheda, causes panic
सिंदेवाही तालूक्यात मोठ्या प्रमाणात वाघ बिबट्यांची दहशत आहे. दरम्यान शनिवारी दुपारच्या सुमारास धुमनखेडा गावात बिबट शिरला. गावात शिरताच लोकांच्या कल्लोळाने बिबट गोंधळला. त्यामुळे कुठे जावे? या प्रयत्नात असलेल्या बिबट्यांनी जयश्री शेंडे (40)सुषमा बन्सोड( 35)चंद्रभान बंसोड़ (55), देवानंद बंसोड़ (40), गावातील या 4 लोकांना जखमी केले.त्यानंतर नरेंद्र मेश्राम यांच्या गोठ्यातशिरला. नागरिकांची गर्दी जमल्याने गोंधळलेल्या बिबट्याने गोठ्यातच आधार घेतला.या घटनेची माहिती मिळताच वनविभागाचे अधिकारी घटनास्थळी पोहचले. त्यांनी बिबटाला रेस्क्यू करण्यासाठी पिंजरा व जाळी टाकली. मात्र गोंधळलेल्या बिबट्याने वनरक्षक नितेश शहारे यांनाही जखमी केले. अनेक प्रयत्नानंतर अखेर शार्प शुटर अजय मराठे यांच्या सहाय्याने बिबट्याल बेशुद्ध करून जेरबंद करण्यात वनविभागाला यश आले. या रेस्क्यू ऑपरेशनसाठी वन परिक्षेत्र अधिकारी विशाल सालकर यांच्या नेतृत्वात वनविभागाचे अधिकारी, स्वॉब संस्थेचे यश कायरकर सिंदेवाहीचे पोलिस निरीक्षक विजय राठोड यांनी प्रयत्न केले
Share on Whatsapp

About The Chandrapur Times

यह पोर्टल संपादक, मालिक, प्रकाशक राजेश सनमाहेन सोलापनद्वारा कार्यालय साप्ताहिक दि चंद्रपुर टाइम्स, आक्केवार वाडी, वॉर्ड नं. १, चंद्रपुर, से प्रकाशित किया गया है । प्रकाशित किसी भी लेखन सामग्री पर संपादक सहमत ही हो यह आवश्यक नही । प्रकाशित कि सी भी लेखनपर आपत्ती हाने पर उनका निस्तारण सूचना प्रौद्योगिकी (प्लेटफ़ॉर्म दिशानिर्देश और डिजिटल मीडिया आचार संहिता) विनियम 2021 के तहत किया जायेगा ।

0 comments:

Post a Comment