राजुरा 27 फेब्रुवारी:-सर्व शिक्षा अभियान / समग्र शिक्षा योजना अंतर्गत सन 2002 पासून संपूर्ण महाराष्ट्र राज्यात सर्व जिल्हा परिषद अंतर्गत जिल्हास्तर , तालुकास्तर, व महानगरपालिका स्तरावर साधनव्येक्ती , सहाय्यक कार्यक्रम अधिकारी, कनिष्ठ अभियंता, डाटा एंट्री ऑपरेटर , रोखपाल, एम. आय. एस. कोर्डिनेटर, लेखा सहाय्यक अशा विविध पदावर समग्र शिक्षा योजने अंतर्गत कार्यरत आहेत.
या सर्व योजनेतील कर्मचारी उच्च पदवीधारक बी. ई. सिव्हिल, बी. एड. एम.एड. , एम.एस.सी. , बी.पी. एड., एम.फिल., पी.एच.डी. असे उच्च शैक्षणिक पात्रता धारक आहेत. सदरील सर्व कंत्राटी कर्मचारी यांची नेमणूक सक्षम प्राधिकारी यांनी वर्तमान पत्रात जाहिराती देऊन बिंदू नमावली, लेखी परीक्षा , मुलाखत अश्या तत्कालीन निवळ कार्यपद्धतीने नेमून दिलेली आहे . हे सर्व कर्मचारी विस - बावीस वर्षांपासून शालेय शिक्षण विषयक प्रशिक्षण देणे , शिक्षण परिषदेत शिक्षकांना मार्गदर्शन करणे , शाळा भेट घेवून आदर्श पाठ घेणे , विद्यार्थी मार्गदर्शन करणे तसेच शासनाच्या प्राथमिक व माध्यमिक शिक्षण विषयक योजना राबविणे, जिल्हा परिषद व मनपा क्षेत्रातील माहितीचे संकलन करणे इत्यादी कामे करतात. तरीपण गेल्या विस वर्षांपासून शासनाने अश्या कर्मचाऱ्यांना तुटपुंज्या मानधनावर ठेऊन त्यांची वीस वर्षांपासून पिळवणूक केलेली आहे. मागील विस वर्षांपासून शासनाच्या दरबारीं अनेक आंदोलने , मोर्चे , उपोषन करून आणी खासदार -आमदार महोदयांना विनंती करून सुद्धा शासनाने कोणत्याही पद्धतीची दखल घेतली नाही .मागील सरकारने समग्र शिक्षा योजनेतील अर्ध्या कर्मचाऱ्यांना शासकीय कर्मचारी म्हणून कायम केले आणि अर्ध्या कर्मचाऱ्यांना कंत्राटी पद्धतीवरच ठेवलेले आहे . एकच योजनेतील अर्धे कर्मचायरी हे तुपाशी आणि अर्धे कर्मचारी हे उपाशी आहेत हा अन्याय दूर करण्यासाठी येत्या 4 मार्च 2025 रोजी सामग्र शिक्षा योजनेतील सर्व कर्मचारी आंदोलन आंदोलन करून आपल्या न्याय हक्कासाठी आझाद मैदान मुंबई येथे आमरण उपोषणावर बसणार आहेत . तरी संपूर्ण महाराष्ट्रातील समग्र शिक्षा योजनेतील कंत्राटी बांधवांनी आपल्या न्याय हक्कासाठी संपूर्ण ताकतीने उपस्थित राहावे असे आवाहन विनय तुळशीराम टिकले , जिल्हाध्यक्ष चंद्रपूर यांनी केले आहे .
0 comments:
Post a Comment