सावली :-२६ फेब्रुवारी रोजी महाशिवरात्रीनिमित्त बाबूपेठ परिसरातील मंडल कुटुंब चंद्रपूर गडचिरोली राष्ट्रीय महामार्गावरील वैनगंगा नदीत आंघोळीसाठी गेले होते. दुपारी १.३० च्या सुमारास, मंडल कुटुंबातील दोन मुली, प्रतिमा प्रकाश मंडल (२३), कविता प्रकाश मंडल (२२) आणि लिपिका प्रकाश मंडल (१८) आंघोळीसाठी गेल्या. खोलीचा अंदाज न आल्याने तिघेही खोल पाण्यात बुडाले.
Three sisters drown in Wainganga river
यासोबतच धाकटा भाऊ आणि पूनमही आंघोळीला गेले. लहान मुलाला बुडताना मदतीसाठी ओरडताच काकांनी त्याला पाण्यातून बाहेर काढले. पूनम ही प्रवाहात तरंगत असताना एका दगडाला धरून असल्याने पुनम प्रणव मंडल (३०) यांना बचाव पथकाने बाहेर काढले. घटनेची माहिती मिळताच सावली पोलीस ठाण्याचे पोलीस अधिकारी प्रदीप पुल्लरवार, मोहन दासरवार, धीरज पिदुरकर, राहुल कुमरेती आणि केवलतुरे हे घटनास्थळी पोहोचले आणि बोटीच्या मदतीने वृत्त लिहीपर्यंत कविता मंडल हिचा मृतदेह हाती लागला होता, तर इतर दोन बहिणींचा शोध सुरू होता.प्रकाश मंडल आणि कल्पना प्रकाश मंडल यांच्या तीन मुली – प्रतिमा, कविता आणि लिपिका यांचा या घटनेत मृत्यू झाल्याने संपूर्ण कुटुंब उद्ध्वस्त झाले आहे. प्रणव मंडल हे चंद्रपूरच्या सरदार पटेल महाविद्यालयात प्राध्यापक आहेत, तर त्यांच्या पत्नी पुनम शिकवणी वर्ग घेतात. त्यांना प्रतिमा मदत करायची. कविता आणि लिपिका शिक्षण घेत होत्या. अचानक घडलेल्या या दुर्घटनेमुळे संपूर्ण मंडल कुटुंबावर शोककळा पसरली आहे.
0 comments:
Post a Comment