जावेद शेख भद्रावती:-भद्रावती शहरातील बसस्थानका समोरील बालाजी कॉम्प्लेक्स येथील मोहित प्रकाश रूपारेल यांच्या मालकीच्या मधुरम नाश्ता पाईटला आग लागल्यामुळे त्यांचे आठ लाख रुपयांचे नुकसान झाले आहे. सदर घटना दिनांक 26 रोज बुधवार ला पहाटे पाचच्या सुमारास घडली.
Fire at Madhuram Breakfast Point, loss of Rs. 8 lakh.
पहाटे दुकानाला आग लागल्याचे लक्षात आल्यानंतर या घटनेची माहिती नगरपरिषदेच्या अग्निशामक विभागाला देण्यात आली. मात्र अग्निशामक गाडी येईपर्यंत दुकानातील सामान पूर्णपणे जळून खाक झाले होते. याआगीत दुकानात असलेले फ्रिज, डीप फ्रिजर, अन्य विद्युत उपकरणे, विविध कोल्ड्रिंक, फर्निचर सर्व जळून खाक झाले. सदर आग शॉर्ट सर्किटने लागली असल्याचा अंदाज व्यक्त होत आहे.मात्र या आगीत हॉटेल मालक मोहित रूपारेल यांचे आठ लाखांचे नुकसान झाल्याचे सांगण्यात आले.
0 comments:
Post a Comment