Ads

ट्रॅव्हल्स मधून सुगंधित तंबाखूची तस्करी करणाऱ्याला राजुरा पोलिसांनी ठोकल्या बेड्या

राजुरा :-दिनांक 06/03/2025 रोजी पोलीस स्टेशन राजुरा येथील पोउपनि पांडुरंग हाके सोबत पोशी तिरुपती जाधव /२८२ हे पोस्टे परीसरात खाजगी वाहनाने पेट्रोलिंग करीत असतांना गुप्त बातमीदाराकडुन माहिती मिळाली की महाराजा ट्राव्हल्सने सुगंधित तंबाखू मजा राजुरा येथील नाका नं ०३ येथे येते आहे
Rajura police arrest man smuggling flavored tobacco through travels

अशी खात्रीशीर खबर मिळाल्याने नाका नं ०३ येथे क्रिष्णा हॉटेलचे समोर सापळा रचून असताना महाराजा ट्रॅव्हल्स आली व त्यामधून पार्सल बाहेर काढले सदर पार्सल मध्ये एका पांढऱ्या रंगाच्या नायलन चुगळीवर मुस्कान राजुरा असे लिहलेले पार्शल चेक केलो असता त्यामध्ये मजा 108 हुक्का शिषा तंबाखू असे लिहलेले सुगंधित तंबाखूचे एकूण 80 नग डब्बे प्रति नग 200 ग्रॅम वजनाचे प्रति नग अंदाजे किंमत 1250 रु अशा एकूण 1,00,000/-₹ चा माल मिळून आला. सदर प्रकरणात आरोपी महादेव काशीनाथ अडवे वय 36 वर्ष रा जवाहरनगर राजुरा ता राजुरा जि चंद्रपूर याला अटक करून गुन्हा दाखल करण्यात आला आहे
सदरची कारवाई मा.उपविभागीय पोलीस अधिकारी साखरे सा याचे मार्गदर्शनात ठाणेदार आयपीएस हिरडे सा यांचे नेतृत्त्वाखाली पोउपनी पांडुरंग हाके,स्टॉप पोशी तिरुपती/२८२ यांनी केली आहे.
गुन्ह्यातील जप्त मुद्देमाल पो. स्टे. राजुरा येथील मुद्देमाल मोहरर कडे जमा केला असून तपास चालू आहे

Share on Whatsapp

About The Chandrapur Times

यह पोर्टल संपादक, मालिक, प्रकाशक राजेश सनमाहेन सोलापनद्वारा कार्यालय साप्ताहिक दि चंद्रपुर टाइम्स, आक्केवार वाडी, वॉर्ड नं. १, चंद्रपुर, से प्रकाशित किया गया है । प्रकाशित किसी भी लेखन सामग्री पर संपादक सहमत ही हो यह आवश्यक नही । प्रकाशित कि सी भी लेखनपर आपत्ती हाने पर उनका निस्तारण सूचना प्रौद्योगिकी (प्लेटफ़ॉर्म दिशानिर्देश और डिजिटल मीडिया आचार संहिता) विनियम 2021 के तहत किया जायेगा ।

0 comments:

Post a Comment