Ads

अवैध बनावट देशी दारू वाहतुक करणारे आयशर वाहन व त्यामधील बनावट देशी दारूच्या ३०० पेटया जप्त

जावेद शेख भद्रावती :- आज दि.०७/०३/२०२५ रोजी स्थानिक गुन्हे शाखा येथील पथके पोलीस स्टेशन गोंडपिपरी हददीत पेट्रोलिंग करीत असतांना गुप्तबातमीदार यांचेकडुन माहिती मिळाली की, एक आयशर ट्रक कं. एमएच-०४ एचवाय - ०५२८ मधुन देशी दारूच्या पेटया वाहतुक होणार आहे, अशा माहितीवरून स्थानिक गुन्हे शाखा चंद्रपूर येथील अधिकारी यांचे वेगवेगळे पथक तयार करून खाजगी वाहनाने नमुद वाहनाचा शोध करीत असतांना गोंडपिपरीकडुन बल्लारशाकडे जाणारा राष्ट्रीय महामार्ग कं. ३५३ बी रोडवर आयशर वाहन पाठलाग करुन ताब्यात घेतले.
Eicher vehicle transporting illegal counterfeit country liquor and 300 boxes of counterfeit country liquor in it seized
नमुद वाहनचालक सागर अशोक परदेशी, वय ३८ वर्ष, व्यवसाय ड्रायव्हर, रा.वाडे, ता. -भडगांव, जि. जळगांव यांचे ताब्यातील एक आयशर कं. आयशर ट्रक कं. एमएच ०४ एचवाय - ०५२८ मध्ये थर्माकॉल खोके व त्याखाली लपवुन ठेवलेल्या कागदी खोक्याच्या पेट्या रॉकेट देशी दारू संत्रा एकुण ३०० पेटया किमती १०,५०,००० रुपये सह एकुण ३०,६०,०००/- रू चा मुददेमाल मिळुन आल्याने पंचनामा कारवाई करून जप्त करण्यात आला आहे. नमुद जप्त देशी दारूची राज्य उत्पादन शुल्क विभाग चंद्रपूर यांचेकडुन पंचनामा कारवाई दरम्यान तपासणी केली असता सदरची देशी दारू ही बनावट असल्याबाबत अभिप्राय प्राप्त झाल्याने पोलीस स्टेशन गोंडपिपरी येथे अप क ३६/२०२५ कलम ३१८(४), ३३६ (२), ३३६ (३),३४० (२),४९ भारतीय न्याय संहिता २०२३, सहकलम महाराष्ट्र दारूबंदी अधिनियम कलम ६५ (अ), (ई), ८३,९० गुन्हा नोंद करण्यात आला आहे. सदरची कारवाई स्थानिक गुन्हे शाखा, चंद्रपूर, राज्य उत्पादन शुल्क विभाग व पोलीस स्टेशन गोंडपिंपरी यांचे उपस्थितीत करण्यात आली आहे.

सदरची कारवाई मा.श्री. सुदर्शन मुम्मका पोलीस अधीक्षक चंद्रपूर, श्रीमती रिना जनबंधु अपर पोलीस अधीक्षक चंद्रपूर यांचे मार्गदर्शनात अमोल काचोरे, पोलीस निरीक्षक, स्थानिक गुन्हे शाखा, चंद्रपूर रमेश हत्तीगोटे, सहायक पोलीस निरीक्षक पो. स्टे गोंडपिपरी, दिपक कांकेडवार, सहायक पोलीस निरीक्षक, बलराम झाडोकार, सहायक पोलीस निरीक्षक, श्री. विनोद भुरले पो.उप.नि, श्री. संतोष निंभोरकर पोउपनि, श्री. मधुकर सामलवार पोउपनि व पोलीस स्टॉफ पोहवा / २४९३ गणेश मोहुर्ले, पोहवा /२२९६ रजनीकांत पुटटावार, पोहवा/५३२ सतिश अवथरे, पोहवा / ८१४ सुभाष गोहोकार, पोहवा/२६२४ दिपक डोंगरे, पोना/२५३५ संतोष येलपुलवार, पोशि/१२३६ किशोर वाकाटे, पोशि/१२४७ शंशाक बदामवार, पोशि/६२० मिलिद जांभुळे, पोशि/९९ अमोल सावे, पोशि/२५७८ प्रशांत नागोसे, स्थानिक गुन्हे शाखा यांनी केली आहे.
Share on Whatsapp

About The Chandrapur Times

यह पोर्टल संपादक, मालिक, प्रकाशक राजेश सनमाहेन सोलापनद्वारा कार्यालय साप्ताहिक दि चंद्रपुर टाइम्स, आक्केवार वाडी, वॉर्ड नं. १, चंद्रपुर, से प्रकाशित किया गया है । प्रकाशित किसी भी लेखन सामग्री पर संपादक सहमत ही हो यह आवश्यक नही । प्रकाशित कि सी भी लेखनपर आपत्ती हाने पर उनका निस्तारण सूचना प्रौद्योगिकी (प्लेटफ़ॉर्म दिशानिर्देश और डिजिटल मीडिया आचार संहिता) विनियम 2021 के तहत किया जायेगा ।

0 comments:

Post a Comment