Ads

भद्रावतीतशिवसेना (शिंदे गट) तर्फे संतोष देशमुख हत्येचा तीव्र निषेध व फाशीची मागणी

जावेद शेख भद्रावती:-
माननीय उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांचे आदेशाने,आमदार डॉ . मनीषा ताई कायंदे शिवसेना सचिव, किरण भाऊ पांडव पूर्व विदर्भ संघटक यांचे सूचनेनुसार, किशोरजी राय जिल्हा संपर्कप्रमुख चंद्रपूर यांचे मार्गदर्शनात, श्री नितीन मत्ते शिवसेना जिल्हाप्रमुख चंद्रपूर यांच्या सूचनेनुसार व शिवसैनिक सुरज भाऊ शाहा यांच्या नेतृत्वात वाल्मीक कराड यांनी केलेल्या संतोष देशमुख यांच्या निर्घृण हत्येचा शिवसेना (शिंदे गट) तर्फे तीव्र निषेध आंदोलन करण्यात आले.
Bhadravati Shiv Sena (Shinde group) strongly condemns the murder of Santosh Deshmukh and demands death penalty
या घटनेच्या निषेधार्थ भद्रावती येथील माननीय बाळासाहेब ठाकरे प्रवेश द्वार येथे शिवसेना (शिंदे गट) च्या वतीने जोरदार आंदोलन करण्यात आले. आंदोलनकर्त्यांनी आरोपींच्या पुतळ्याला जोडे मारो आंदोलन करत त्याचे दहन केले. तसेच, या घटनेतील दोषींना तात्काळ अटक करून कठोर कारवाई करावी व त्यांना फाशीची शिक्षा द्यावी, अशी मागणी करण्यात आली.

या आंदोलनात शिवसेना (शिंदे गट) च्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला. संतोष देशमुख यांची हत्या म्हणजे कायद्याचा उल्लंघन करणाऱ्या प्रवृत्तींचे भयावह रूप असून, दोषींना कठोर शासन न झाल्यास असे प्रकार वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे शिवसेनेच्या वतीने आरोपी वाल्मीक कराड याला फाशीची शिक्षा देण्यात यावी, अशी मागणी यावेळी करण्यात आली.

यावेळी उपस्थित शिवसेना (शिंदे गट) चे तालुका प्रमुख कडसकर साहेब, उपतालुका प्रमुख सिंगलदीप पेंदाम, उपतालुका प्रमुख सुंदर सिंह, शिवसैनिक सुमित हस्तक, उपशहर प्रमुख मनीष बुच्चे, प्रथम गेडाम , अक्षय आस्कर , सूरज ढवळे, राहुल आस्कर , रितेश बुच्चे, साहिल कसारे , सुंदर, ओम पारखी, स्थानिक नेते व कार्यकर्त्यांनी संतोष देशमुख यांना श्रद्धांजली अर्पण केली आणि या घटनेचा कठोर शब्दांत निषेध व्यक्त केला.
Share on Whatsapp

About The Chandrapur Times

यह पोर्टल संपादक, मालिक, प्रकाशक राजेश सनमाहेन सोलापनद्वारा कार्यालय साप्ताहिक दि चंद्रपुर टाइम्स, आक्केवार वाडी, वॉर्ड नं. १, चंद्रपुर, से प्रकाशित किया गया है । प्रकाशित किसी भी लेखन सामग्री पर संपादक सहमत ही हो यह आवश्यक नही । प्रकाशित कि सी भी लेखनपर आपत्ती हाने पर उनका निस्तारण सूचना प्रौद्योगिकी (प्लेटफ़ॉर्म दिशानिर्देश और डिजिटल मीडिया आचार संहिता) विनियम 2021 के तहत किया जायेगा ।

0 comments:

Post a Comment