राजूरा :-प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजने अंतर्गत राजूरा तालुक्यातुन प्रत्येक केंद्रातील उत्कृष्ठ पाककृती असलेल्या एकाची निवड करून प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजनेतील पात्र शाळांची तालुका स्तरावरील पाककृती स्पर्धा आदर्श मराठी प्राथमिक विद्यामंदिर राजूरा या शाळेत संपन्न झाली.
Taluka level cooking competition held at Adarsh School.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मनोज गौरकार, गटशिक्षणाधिकारी , पं. स. राजुरा यांची उपस्थिती होती. तर प्रमुख अतिथी म्हणून बालविद्या शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष सतीश धोटे, सचिव भास्करराव येसेकर, विस्तार अधिकारी पं.स.राजूराचे संजय हेडाऊ, विशाल शिंपी, प्रभाकर जुनघरे, रामा पवार, केंद्रप्रमुख, राजकुमार भुरे, विषेश शिक्षक, राहुल रामटेके, डी. ई. ओ. शालेय पोषण आहार, तिरपत्तीवार, केंद्र प्रमुख, नारायण तेलकापल्लीवार, केंद्र प्रमुख , नलिनी पिंगे, मुख्याध्यापिका आदर्श प्राथमिक, सारीपुत्र जांभूळकर, मुख्याध्यापक, आदर्श हायस्कूल, बादल बेले, राष्ट्रीय हरित सेना विभाग प्रमुख तथा पर्यवेक्षक आदींची प्रामुख्याने उपस्थिती होती. यावेळी स्पर्धेचे वस्तुनिष्ठ परीक्षण करण्यासाठी पंचायत समिती राजूरा च्या परीक्षक म्हणून मंगला तोडे, विस्तार अधिकारी, बिट चुनाळा, किरण कामडी, केंद्र प्रमुख, केंद्र साखरी यांची उपस्थिती होती.यावेळी पाककृती करताना तांदूळ, नाचणी, बाजरी, ज्वारी , मका, मोट, चना, यापासून वेगवेगळे पदार्थ तयार करण्यात आले. पाककृतीचे नाव, पदार्थ बनविण्यासाठी वापरलेले साहित्य, पदार्थ बनविण्याची कृती, पाककृती सजावट, पदार्थाची चव, पदार्थाचे सादरीकरण आदींवर मूल्यांकण करण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शिक्षिका जयश्री धोटे यांनी केले. प्रास्तावीक नलिनी पिंगे यांनी तर आभार प्राजक्ता साळवे यांनी मानले. विजेत्यांना जिल्हा स्तरावर होणाऱ्या पाककृती स्पर्धेत सहभागी होता येणार आहे. या स्पर्धेतील विजेत्यांना रोख रक्कम दिली जाणार आहे.
0 comments:
Post a Comment