राजुरा 15 मार्च :-
नैसर्गिक पर्यावरण संवर्धन व मानवता विकास संस्थेचे महाराष्ट्र राज्य युवा अध्यक्ष बबलु चव्हाण यांच्या वाढदिवसानिमित्याने महात्मा ज्योतिबा फुले विद्यालयातील राष्ट्रसंत तुकडोजी महाराज वसतिगृहातील विद्यार्थांना व आदर्श शाळेतील राष्ट्रिय हरीत सेनेच्या विद्यार्थांना भोजनदान तसेच महिलांना साडी वाटप करून वाढदिवस साजरा करण्यात आला.
Bablu Chavan's birthday was celebrated with various social activities.
यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी बालविद्या शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष सतीश धोटे यांची उपस्थिती होती. तर प्रमूख अतिथी म्हणून नैसर्गिक पर्यावरण संवर्धन व मानवता विकास संस्थेचे नागपूर विभाग अध्यक्ष विजयकुमार जांभूळकर, राष्ट्रीय कला साहित्य व सांस्कृतिक विकास समिती नागपूर विभाग महिला अध्यक्षा रजनी शर्मा, विलास कुंदोजवार, मोहनदास मेश्राम, श्रीरंग ढोबळे, आदर्श प्राथमिक शाळेच्या मुख्याध्यापिका नलिनी पिंगे, आदर्श हायस्कूल चे मुख्याध्यापक सारीपुत्र जांभूळकर, आशिष करमरकर, वर्षा कोयचाडे, रवी बुटले, रूपेश चीडे, आकाश वाटेकर, जयश्री धोटे, भूषण रागीट, स्वप्नील म्याकलवार , सुजीत पोलेवार आदींची प्रामुख्याने उपस्थिती होती. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार बादल बेले यांनी केले. यावेळी नैसर्गिक पर्यावरण संवर्धन व मानवता विकास संस्थेचे राष्ट्रिय अध्यक्ष सुयोग धस, राष्ट्रीय उपाध्यक्ष दिपक भवर, सचिव सचिन वाघ, आशिया रिजवी, महाराष्ट्र राज्य अध्यक्ष बादल बेले, सचिव बापू परब, उपाध्यक्ष प्रकाश कदम, महीला अध्यक्षा डॉ. प्रीती तोटावार , उपाध्यक्षा तेजस्विनी नागोसे , रत्ना चौधरी, सूनैना तांबेकर, संतोष देरकर आदींनी अभिनंदन केले. नैसर्गिक पर्यावरण संवर्धन व मानवता विकास संस्थेच्या वतीने गरजूंना मदत, वृक्षारोपण, वृक्ष संवर्धन, पर्यावरण जनजागृती असे विवीध उपक्रमद्वारे वाढदिवस साजरे केल्या जातात.
0 comments:
Post a Comment