Ads

अर्थसंकल्पीय अधिवेशनात खासदार धानोरकरांनी वेधले सरकार चे लक्ष.

दिल्ली येथे सुरु असलेल्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात खासदार प्रतिभा धानोरकर यांनी विविध प्रश्नांच्या माध्यमातून केंद्र सरकार चे लक्ष वेधले आहे. यात प्रामुख्याने जिवती तालुक्यातील पाणी समस्या, केंद्राकडून खासदारांना मिळणारा अत्यल्प विकास निधी तसेच चंद्रपूर-वणी महामार्गावर असलेल्या सलग दोन टोल नाक्याच्या संदर्भातील विषयांचा समावेश आहे.
MP Dhanorkar drew the government's attention during the budget session.
अर्थसंकल्पीय अधिवेशनात खासदार प्रतिभा धानोरकर यांनी आपल्या लोकसभा क्षेत्रातील समस्यांच्या निराकरणासाठी प्रश्नांच्या माध्यमातून केंद्र सरकारचे लक्ष वेधले आहे. जिवती तालुक्यातील पाणी प्रश्नांच्या संदर्भात सरकार कडे विचारणा केली असून येल्लापूर येथील नागरीकांना पाण्या अभावी गाव सोडून जाण्याची वेळ येत असल्याचे सरकार च्या निर्दशनास आणून दिले. या संदर्भात केंद्र सरकार जल शक्ती मंत्र्याद्वारे दिलेल्या उत्तरात तालुक्यात 85.19 टक्के पाणी पुरवठ्याचे काम पुर्ण झाले असून संपुर्ण तालुक्यातील पाणी प्रश्न लवकरच राज्य सरकारच्या माध्यमातून सोडवणार असल्याचे सांगितले. त्या सोबतच, खासदारांना लोकसभा क्षेत्रातील विकासात्मक कामाकरीता मिळणारा निधी अत्यल्प असून यात वाढ करण्याच्या संदर्भात सरकार चे लक्ष वेधले. या संदर्भात प्रश्नांवर हरीयाणा राज्यातील खासदारांना 50 कोटी रुपये तर राज्यसभा सदस्यांना 32.5 कोटी रुपये निधी मिळत असल्याचे सांगितले. भविष्यात लोकसभेतील खासदारांच्या विकास निधीत वाढ करणार असल्याचे सांगितले. त्या सोबतच चंद्रपूर-वणी महामार्गावर 60 किमी दरम्यान दोन टोल नाके असून ह्या दोन्ही टोल नाक्यावर नागरीकांकडून टोल वसूल केला आज आहे. नियमानुसार हे चुकीचे असल्याचे खासदार धानोरकर यांनी रस्ते वाहतूक मंत्री नितिन गडकरी यांना प्रश्नाच्या माध्यमातून निदर्शनास आणून दिले. यावर योग्य ती कार्यवाही करणार असल्याचे मंत्री महोदयांनी सांगितले.
Share on Whatsapp

About The Chandrapur Times

यह पोर्टल संपादक, मालिक, प्रकाशक राजेश सनमाहेन सोलापनद्वारा कार्यालय साप्ताहिक दि चंद्रपुर टाइम्स, आक्केवार वाडी, वॉर्ड नं. १, चंद्रपुर, से प्रकाशित किया गया है । प्रकाशित किसी भी लेखन सामग्री पर संपादक सहमत ही हो यह आवश्यक नही । प्रकाशित कि सी भी लेखनपर आपत्ती हाने पर उनका निस्तारण सूचना प्रौद्योगिकी (प्लेटफ़ॉर्म दिशानिर्देश और डिजिटल मीडिया आचार संहिता) विनियम 2021 के तहत किया जायेगा ।

0 comments:

Post a Comment