चंद्रपुर :-डॉ.बाबासाहेब आंबडेकर यांनी मूकनायक वृत्तपत्रापासून आपली भूमिका स्पष्ट केली.तीच भूमिका बॅरिस्टर खोब्रागडॆ यांनी घेतली त्यातूनच साप्ताहिक प्रजासत्ताक रिपब्लिकन पक्षाचे मुखपत्र झाले. असे प्रतिपादन जेष्ठ रिपब्लिकन नेते व साप्ताहिक प्रजासत्ताकचे कार्यकारी संपादक व्ही.डी.मेश्राम यांनी केले.
Barrister Khobragade gave a new direction to Ambedkarite journalism. V.D.Meshram
बॅरिस्टर राजाभाऊ खोब्रागडॆ जन्मशताब्दी महोत्सव समिती नागपूर द्वारा आयोजित साप्ताहिक प्रजासत्ताक दिनाचे वर्धापन दिनानिमित्ताने आंबडेकरी पत्रकारिता या व्याख्यानमालेत त्यांनी आपले विचार मांडले.यावेळी समिती तर्फे त्यांचा जाहीर सत्कार करण्यात आला.बॅरिस्टर साहेब म्हणजे राजकारणातील विचार पूर्वक नेतृत्व होय, म्हणूनच विरोधी पक्षात असूनही त्यांना राज्यसभा उपसभापती पदाचा सन्मान मिळाला होता. असे मत त्यांनी सत्काराला उत्तर देतांना मांडले .कर्मवीर बाबू हरिदास आवळे स्मृती सभागृह,पाटणकर चौक, नागपूर येथे 03 मार्च 2025 सायंकाळी 5 वाजता सदर कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.बॅरिस्टर राजाभाऊ खोब्रागडॆ जन्मशताब्दी महोत्सव समिती नागपूर चे अध्यक्ष प्रा.अशोक गोडघाटे आपल्या अध्यक्षीय भाषणात बोलले की बॅरिस्टर साहेबांनीच साप्तहिक प्रजासत्ताक ची जबाबदारी व्ही.डी.मेश्राम यांच्यावर सोपवली होती.ज्याला त्यांनी सर्व शक्तीनिशी न्याय दिला.यातूनच त्यांनी तुरुंगवास भोगला होता.ज्येष्ठ साहित्यिक ताराचंद खांडेकर विचार मांडताना म्हणाले की वृत्तपत्र काढण्यासाठी मोठी ताकत लागते.पाक्षिक ते साप्ताहिक ते दैनिक हा प्रवास सोपा नसतो.यावेळी बॅरिस्टर साहेबांची पुतणी प्रा.गौतमी डोंगरे खोब्रागडे व ज्येष्ठ विचारवंत इ.मो.नारनवरे यांनी देखील आपले विचार मांडले. प्रास्ताविक भीमराव वैद्य,संचालन विलास गजभिये तर आभार छाया खोब्रागडे यांनी मांडले. यावेळी अशोक कोल्हटकर ,सुरेश पाटील, राकेश खोब्रागडे, डॉ. ताराचंद मेश्राम डॉ. सुरेश भोवते, डॉ. पियुष मेश्राम, सखाराम मंडपे, ऍड. सुरेश घाटे, कल्पना मेश्राम, सिद्धार्थ पाटील, महेंद्र गायकवाड, प्रकाश रामटेके तसेच उत्तर नागपुरातील नागरिकांची प्रामुख्याने उपस्थिती होती.
0 comments:
Post a Comment