सादिक थैम वरोरा:भद्रावती आणि वरोरा तालुक्यातील घरकुल योजनेतील लाभार्थ्यांना घरे बांधण्यासाठी आवश्यक असलेली रेती मिळत नसल्याने अनेक घरकुलांचे काम अर्धवट राहिले आहे. तालुक्यातील रेती घाट बंद असल्यामुळे लाभार्थ्यांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. या पार्श्वभूमीवर शिवसेनेचे लोकसभा संघटक मुकेश जिवतोडे यांच्या नेतृत्वाखाली वरोरा आणि भद्रावती तहसीलदार तसेच उपविभागीय अधिकाऱ्यांशी चर्चा करून त्यांना निवेदन देण्यात आले.
Provide sand to Gharkul beneficiaries immediately at government rates – Mukesh Jivatode
या निवेदनात, घरकुल लाभार्थ्यांना तातडीने रेतीपुरवठा करण्याची मागणी करण्यात आली आहे. शासनाच्या घरकुल योजनेत मंजूर लाभार्थ्यांनी घरांचे बांधकाम सुरू केले आहे, मात्र रेतीच्या टंचाईमुळे घरे अपूर्ण अवस्थेत आहेत. त्यामुळे शासनाने त्वरित उपाययोजना करून लाभार्थ्यांना शासकीय दराने रेती उपलब्ध करून द्यावी, अशी शिवसेनेची ठाम मागणी आहे.
यावेळी झालेल्या चर्चेत, वरोरा व भद्रावती तालुक्यातील रेती घाटातून घरकुल लाभार्थ्यांना रेती उपलब्ध करून देण्याची विशेष व्यवस्था करून देण्यात यावी व पर्यायी व्यवस्था करून घरकुल धारकांना दिलासा द्यावा, अशी स्पष्ट भूमिका मांडण्यात आली. प्रशासनाने यावर तातडीने योग्य निर्णय घ्यावा घरकुल धारकांना दिलासा द्यावा अशी मागणी यावेळी करण्यात आली.यावेळी निवेदन देताना उपतालुका प्रमुख मंगेश ढेंगळे, युवासेना माजी उपजिल्हा प्रमुख महेश जिवतोडे, धानोली उपसरपंच ज्ञानेश्वर खापणे,
डोंगरगाव खडी सरपंच मनिषा तुराणकर,उपसरपंच जगदीश चौधरी व असंख्य नागरिक उपस्थित होते.
0 comments:
Post a Comment