Ads

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वातील नव्या राज्य सरकारचा पहिला अर्थसंकल्प रोजगाराभिमुख व सर्वसमावेशक : डॉ.अशोक जीवतोडे

चंद्रपूर : माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली अर्थमंत्री अजित पवार यांच्या माध्यमातून आज (दि.१०) ला माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या नेतृत्वातील नविन सरकारचा महाराष्ट्र राज्याचा अर्थसंकल्प हा आगामी काळात ७१ लाख ७ हजार ५०० रोजगार देण्याचा संकल्प असलेला अर्थसंकल्प असल्याने तो रोजगाराभिमुख अर्थसंकल्प असल्याचे भारतीय जनता पक्ष ओबीसी मोर्चाचे महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष डॉ. अशोक जीवतोडे यांनी म्हटले आहे.
The first budget of the new state government led by Chief Minister Devendra Fadnavis is employment-oriented and inclusive: Dr. Ashok Jeevtode
सर्व घटकांना सोबत घेऊन चालणारा हा सर्वसमावेशक अर्थसंकल्प आहे. या अर्थसंकल्पात भौतिक संसाधनांसोबत नागरिकांच्या उन्नतीचा सर्वांगीण विचार करण्यात आलेला आहे. एकूणच राज्याला पुढील काळात नविन दिशा देणारा व विकसित महाराष्ट्राकडे नेणारा हा अर्थसंकल्प असल्याचे भारतीय जनता पक्ष ओबीसी मोर्चाचे महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष डॉ. अशोक जीवतोडे यांनी पुढे म्हटले आहे.

या अर्थसंकल्पात मायक्रोसॉफ्ट तर्फे महिलांना प्रशिक्षण, गडचिरोली रोड साठी ५०० कोटींची तरतूद, गोसेखुर्द प्रकल्पाला २०२५ पर्यंत पूर्ण करणार, कौशल्य रोजगारांसाठी ८०७ कोटींची तरतूद, रस्ते विकासाठीची कामे विकासपथावर तथा भरीव तरतूद, नैसर्गिक शेती अभियानासाठी २५५ कोटींची तरतूद, कृषिक्षेत्रासाठी एआय धोरण राबविणार, ग्रामपंचायत स्तरावर स्वयंचलित हवामान केंद्र उभारणार, नविन गृहनिर्माण धोरण राबविणार, आदिवासी विकासासाठी भरीव तरतूद, एक तालुका एक बाजार समिती धोरण राबविणार, लाडकी बहीण योजनेसाठी ३६ हजार कोटींची तरतूद, २४ लाख महिलांना लखपती दीदी करण्याचं लक्ष, बचत गटांना हक्काची बाजारपेठ त्यासाठी प्रत्येक जिल्ह्यात मॉल उभारणार, ३ हजार हून अधिक गावे मुख्य रस्त्यांना जोडणार, ८८४०० कोटी रस्ते काँक्रीटीकरण उद्दिष्ट, शेतकऱ्यांना पीक विमा सल्ला, समृद्धी महामार्गाचा अखेरचा टप्पा काम पूर्णत्वाकडे, नदी व धरणातील गाळ उपसा, नदी जोड प्रकल्प, सर्व विभागांना न्याय देण्याचे प्रयत्न, राज्याची अर्थव्यवस्था १ ट्रिलियन डॉलर करण्याचे उद्दिष्ट, आदी कल्याणकारी भौतिक संसाधन व नागरिकांच्या उन्नतीचा सर्वांगीण विचार करणाऱ्या अनेक योजनांचा समावेश असल्याचे डॉ. अशोक जीवतोडे यांनी म्हटले आहे.
Share on Whatsapp

About The Chandrapur Times

यह पोर्टल संपादक, मालिक, प्रकाशक राजेश सनमाहेन सोलापनद्वारा कार्यालय साप्ताहिक दि चंद्रपुर टाइम्स, आक्केवार वाडी, वॉर्ड नं. १, चंद्रपुर, से प्रकाशित किया गया है । प्रकाशित किसी भी लेखन सामग्री पर संपादक सहमत ही हो यह आवश्यक नही । प्रकाशित कि सी भी लेखनपर आपत्ती हाने पर उनका निस्तारण सूचना प्रौद्योगिकी (प्लेटफ़ॉर्म दिशानिर्देश और डिजिटल मीडिया आचार संहिता) विनियम 2021 के तहत किया जायेगा ।

0 comments:

Post a Comment