सादिक थैम वरोरा : शेतकऱ्यांच्या हितकारक अनेक समस्या शासन - प्रशासनाचे दारी प्रलंबित असल्यामुळे न्याय हक्कासाठी शेतकरी नेते किशोर डुकरे यांनी आपल्या हजारो शेतकऱ्यांना सोबत घेऊन वरोरा येथील रत्नमाला चौक येथे चंद्रपूर - नागपूर महामार्गावर १० मार्च २०२५ ला दुपारी १ वाजता चक्का जाम आंदोलनाला सुरुवात केली. महामार्गावरून वाहतूक सुरू असते.वाहतुकीत खोळंबा होऊ नये आणि जनतेला त्रास होऊ नये किंबुहूना कायदा व सुव्यवस्था धोक्यात येऊ नये यासाठी पोलिसांनी काही वेळातच आंदोलनकारी शेतकऱ्यांना ताब्यात घेतले.
Chakkajam protest for farmers' rights
सामाजिक कार्यकर्ते किशोर डुकरे यांच्या नेतृत्वात शेतकऱ्यांच्या विविध बांधण्यासाठी रत्नमाला चौक वरोरा येथे चक्काजाम आंदोलन करण्यात आले होते. यावेळी तालुक्यातील व जिल्ह्यातील बरेच शेतकरी मोठ्या प्रमाणात उपस्थित होते. वारंवार आंदोलने आणि निवेदने देऊनही प्रशासनाने कोणतेही उत्तर आज पर्यंत दिलेले नाही. त्यामुळे नाईलाजास्तव शेतकऱ्यांच्या मागण्या सरकारपर्यंत पोहोचवण्यासाठी चक्काजाम आंदोलन करण्यात आल्याचे डुकरे यांनी सांगितले. यापुढेही यापेक्षा तीव्र आंदोलन करण्याचा इशारा त्यांनी दिला आहे.
यावेळी शेतकऱ्यांकडून खालील मागण्यांचे निवेदन सादर करण्यात आले.
शेतकऱ्यांच्या हिताच्या काही समस्या वर्षांपासून शासन - प्रशासन दरबारी प्रलंबित आहे.त्यासाठी शेतकरी नेते किशोर डुकरे यांनी न्यायहक्कासाठी चक्का जाम आंदोलनाचे रणशिंग फुंकले. आंदोलनापूर्वी किशोर डुकरे यांनी
1 मार्च 2021 नंतर डिमांड भरलेल्या शेतकऱ्यांना तात्काळ विज जोडणी संबंधित विभागाकडून करण्यात यावी.
मुख्यमंत्री यांनी निवडणुकीत दिलेले कर्जमाफीचे आश्वासन पूर्ण करून,मागील वर्षीचा कपाशी वरील पिक विमा तसेच चालू वर्षातील खरीप हंगामातील पिक विमा शेतकऱ्यांना लवकरात लवकर देण्यात यावा.
नाफेडची सोयाबीन खरेदी मुदत वाढविण्यात यावी तसेच भावामधील तफावत म्हणून शेतकरी यांना प्रति क्विंटल 500/- रुपये बोनस म्हणून देण्यात यावे.
सन 2024-25 मधील पूर्ण हंगाम होईपर्यंत सीसीआय ची कापूस खरेदी सुरु ठेवण्यात यावी.
गरजू शेतकरी यांना तात्काळ नवीन विज जोडणीसाठी डिमांड देण्यात यावे. या सर्व मागण्या निवेदनात अंतर्भूत आहे.परंतु शासन व प्रशासनाच्या वेळकाढू व दुर्लक्षित धोरणामुळे मागणी करण्यात आलेल्या एकाही समस्याचे निवारण होऊ शकले नाही.त्यामुळे शेतकऱ्यांना रस्त्यावर उतरावे लागले .प्रशासनाने समस्यांची दखल घेतली नाही तर यापेक्षा तीव्र आंदोलन करण्याचा इशारा किशोर डुकरे यांनी दिला आहे.
कायदा व सुव्यवस्था बिघडू नये यासाठी पोलिसांनी घेतले आंदोलनकारी शेतकऱ्यांना ताब्यात
शेतकऱ्यांना आपल्या न्याय हक्कासाठी आंदोलन करण्याचा अधिकार आहे.परंतु सदर चक्का जाम आंदोलन हे चंद्रपूर - नागपूर महामार्गावर करण्यात आलेल्या आंदोलनामुळे वाहतूक विस्कळित झाली होती.वाहतूक विस्कळित होऊन जनतेला त्रास होऊ नये व कायदा व सुव्यवस्था धोक्यात येऊ नये .यासाठी पोलिसांनी आंदोलनकारी शेतकऱ्यांना ताब्यात घेतले.
0 comments:
Post a Comment