खासदार धानोरकरांचा केंद्र सरकारला प्रश्न
न्यु दिल्ली :- अर्थसंकल्प अधिवेशनादरम्यान पुरवणी मागण्यावरील चर्चेत शेतकऱ्यांच्या प्रश्नासंदर्भात खासदार प्रतिभा धानोरकर आक्रमक झाल्याचे चित्र लोकसभेत दिसून आले. त्यासोबतच सिचंन व्यवस्था, शेतकरी आत्महत्या, ग्रामीण भागातील रस्त्यांची दयनिय अवस्था यावर प्रामुख्याने खासदार धानोरकर यांनी सरकार ला प्रश्न विचारुन यावर तात्काळ निर्णय घेण्यात यावे अशी मागणी केली.
Why is the government unconcerned to farmers?
शेतकरी हा जगाचा पोशिंदा आहे. परंतु, चंद्रपूर-यवतमाळ जिल्ह्यात सर्वात जास्त शेतकऱ्यांच्या आत्महत्या होत असल्याचे विधान खासदार धानोरकर यांनी लोकसभेत व्यक्त केले. शेतमालाला हमीभाव, शेती सिचंनाकरीता पाणी त्यासोबच, सरकार ने आश्वासीत केलेली कर्ज माफी तात्काळ करावी अशी मागणी खासदार धानोरकर यांनी लोकसभेत केली. मागील 10 वर्षात सर्वच क्षेत्रात केंद्र सरकार अपयशी ठरल्याची भावना देखील खासदार धानोरकर यांनी व्यक्त केली. शेतकरी, शेतमजूर यांच्या प्रति हे सरकार उदासीन असल्याचे खासदार धानोरकर लोकसभेत म्हणाल्या. नदी जोड अभियानाच्या माध्यमातून बारमाही पाणी नदीला राहील या करीता नदी जोड अभियान राबवावे, अशी देखील मागणी खासदार धानोरकर यांनी केली. ग्रामीण भागातील रस्त्यांसाठी ग्रामविकास विभागाने निधी उपलब्ध करुन द्यावा असे मत देखील खासदार धानोरकर यांनी लोकसभेत व्यक्त केले. विविध उद्योग किंवा प्रकल्पात जमीनी जात असतांना सध्याचा दर अतिशय कमी असून त्यात वाढ करण्याची मागणी देखील खासदार धानोरकर यांनी लोकसभेत केली. हर घर नल योजने संदर्भात देखील सरकार पुर्णपणे अपयशी ठरले असून अद्याप ही योजना कार्यान्वीत झाली नसल्याचे मत खासदार महोदयांनी सभागृहात व्यक्त केले. देशाच्या विकासाकरीता शेतकऱ्यांच्या संदर्भाने केंद्र सरकारने योग्य ते निर्णय घेऊन शेतकऱ्यांप्रती कृतज्ञता व्यक्त करावी अशी मागणी देखील खासदार धानोरकर यांनी लोकसभेत केली.
About
The Chandrapur Times
यह पोर्टल संपादक, मालिक, प्रकाशक राजेश सनमाहेन सोलापनद्वारा कार्यालय साप्ताहिक दि चंद्रपुर टाइम्स, आक्केवार वाडी, वॉर्ड नं. १, चंद्रपुर, से प्रकाशित किया गया है । प्रकाशित किसी भी लेखन सामग्री पर संपादक सहमत ही हो यह आवश्यक नही । प्रकाशित कि सी भी लेखनपर आपत्ती हाने पर उनका निस्तारण सूचना प्रौद्योगिकी (प्लेटफ़ॉर्म दिशानिर्देश और डिजिटल मीडिया आचार संहिता) विनियम 2021 के तहत किया जायेगा ।
0 comments:
Post a Comment