भद्रावती तालुका प्रतिनिधी :-भद्रावती- मा. गटशिक्षणाधिकारी डॉ श्री प्रकाशजी महाकाळकर साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली नवव्या शिक्षण परिषदेचे औचित्य साधून तालुक्यातील ढोरवासा केंद्राने केंद्रातील सर्व महिला शिक्षकांचा सत्कार करून कृतज्ञता जपली.
नुकतेच केंद्रातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, चारगाव येथे नवव्या शिक्षण परिषदेची यशस्वी सांगता करण्यात आली यात अध्यक्ष म्हणून मा सौ गीता रोहनकर उपाध्यक्ष शाळा व्यवस्थापन समिती, उदघाटक मा सौ सुचिता बोबडे अध्यक्ष शाळा व्यवस्थापन समिती तर प्रमुख पाहुणे मा श्री आकाश जुनघरे सरपंच चारगाव, पांडुरंग वांढरे उपसरपंच चारगाव हे लाभले होते.
केंद्रप्रमुख मा श्रो भारतजी गायकवाड सर यांच्या आयोजनात तज्ञ मार्गदर्शकाची भूमिका निभावली ती सौ ज्योती पारखी मॅडम, अजय मुसळे सर, रमेश वाकडे सर, वसंत जांभुळे सर यात कार्यक्रमाच्या सुरवातीला दिपप्रज्वलन करून व मान्यवरांचे स्वागत करून परिषदेची सुरुवात करण्यात आली. परिषदेच्या प्रास्ताविकेत गायकवाड सर यांनी साहित्याचा वापर करून विद्यार्थ्यांना निपुन कसे करता येईल, परिपाठात इंग्रजी भाषेचा प्रभावी वापर केल्यास मुलांच्या ज्ञानात भर पडेल असे प्रतिपादन केले.
महिला दिनाचे औचित्य साधुन महिलांना एक समर्पक कवीला बहाल करताना गायकवाड सर म्हणाले की
कोमल है तू कमजोर नही है,
शक्ती का नाम ही नारी है
जग को जीवन देने वाली
मौत भी तुझसे हारी है।
सतियो के नाम पे तुझे जलाया
मीरा के नाम पे जहर पिलाया
सीता जैसे अग्नी परीक्षा
जग मे अब तक जारी है
कोमल है तू कमजोर नही है
शक्ती का नाम ही नारी है।
इल्म हुनर मे, दिल दिमाग मे,
किसीं बात पे कमजोर नही
पुरुषो वाले सारे ही
अधीकारो की अधिकारी है
कोमल है तू कमजोर नही है
शक्ती का नाम ही नारी है।
बहोत जो चुका अब मत सहना,
तुझे इतिहास बदलना है,
नारी को कोई कह ना पाये,
अबला है बेचारी है
कोमल है तू कमजोर नही है
शक्ती का नाम ही नारी है।
या गीताने वातावरण निर्मिती करून केंद्रातील तीन आदर्श शिक्षीकांना शाल, प्रमाणपत्र व सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले यात सुप्रिया कोडापे मॅडम, संध्या भडके मॅडम, ज्योती पारखी मॅडम यांचा समावेश आहे.
सोबतच केंद्रातील सर्व महिला शिक्षकांना शाल, पुष्पगुच्छ व कर्तृत्ववान महिलांचे पुस्तक देऊन सन्मानित करून महिला दिनानिमित्त कृतज्ञता जपण्यात आली
कार्यक्रमाचे संचलन सौ मनीषा चन्नावार मॅडम तर आभार प्रदर्शन वसंत जांभुळे सर यांनी केले.
0 comments:
Post a Comment