राजुरा 9 मार्च :-
सर्वोदय विद्यालय सास्ती येथे माजी विद्यार्थांचा स्नेहमिलन सोहळा नुकताच संपन्न झाला. तब्बल बत्तीस वर्षानंतर सर्वोदय विद्यालय सास्ती येथे सन १९९३- ९४ इयत्ता दहावीत शिकलेल्या बॅचने या कार्यक्रमाचे आयोजन केले होते.
Former students reunited after thirty-two years.
कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून शाळेच्या मुख्याध्यापिका पुष्पा जाधव यांची उपस्थिती होती. तर प्रमुख पाहुणे म्हणून आत्माराम शेंडे, गोपाळराव बुरांडे,सुकलदास कांबळे , नागेश्वर सिंगाराव बाबू ,आनंदराव मत्ते, शरद खरतड , कुंदा कवलकर आदींची उपस्थिती होती. जागतिक महिला दिनाचे अवचित्य साधून कार्यक्रमाची सुरुवात सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेला माल्यारपण व दीपप्रज्वलन करून झाली. शेंडे व बुरांडे सरांनी कार्यक्रमाची सुरुवात केली. सर्व गुरुजनांचे स्वागत ग्रुप बनवून सर्व विद्यार्थ्यांनी शाल , श्रीफळ , पुष्पगुच्छ व हार घालून सत्कार करण्यात आला. यानंतर गुरुजनाचे मार्गदर्शन पर भाषण झाले. नंतर शाळेतील दिवंगत शिक्षक व विद्यार्थ्यांना दोन मिनिटे मौन पाडून श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. यावेळी शाळेतील विद्यमान शिक्षक समीर वानखेडे, रमेश अडवे, मधूकर राठोड, प्रतिभा हरडे, शिपाई सुधाकर गर्गेलवार आदींची उपस्थिती होती. प्रत्येक माजी विद्यार्थ्याने व विद्यार्थिनींनी आपापला परिचय दिला . कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संजय जुनघरी यांनी केले. छबुताई वैरागडे यांनी सुरेखपणे आलेल्या सर्व पाहुणे, गुरूजणांचे व माजी विद्यार्थांचे आभार मानले. स्नेहभोजनाने कार्यक्रमाची सांगता कऱण्यात आली. कार्यक्रमाच्या यशस्वीतेकरिता चंदू ताला , लोकेश जानवे व इतर सर्व माजी विद्यार्थ्यांनी परिश्रम घेतले. यावेळी उपस्थित माजी विद्यार्थांनी आपल्या जुन्या आठवणींना उजाळा देऊन शाळेप्रती कृज्ञता व्यक्त केली. शालेय शिक्षण घेतांनाच्या अनेक आठवणीं असतात परंतु पुढील जीवनात वेगवेगळ्या क्षेत्रात कार्य करीत पारिवारिक जबाबदाऱ्या असल्याने एकमेकांच्या गाठीभेटी होत नाही. परंतू माजी विध्यार्थी म्हणून एकत्रित येण्याचा हा योगायोग साधून बरेचसे माजी विद्यार्थी एकत्रित आले. शालेय जीवनानंतरचा बत्तीस वर्षांचा कालावधी फार मोठा आहे. तरीही एकमेकांचा संपर्क साधुन हे सर्व माजी विध्यार्थी एकत्रित आल्याने सर्व गुरुजनानी त्यांचे कौतुक केले.
0 comments:
Post a Comment