चंद्रपूर – शांतीनगर येथील नागरिकांनी लॉयडस मेटल्स कंपनीवर विश्वासघात केल्याचा आरोप करत कंपनीवर तात्काळ कायदेशीर कारवाई करण्याची मागणी केली आहे. 30 वर्षांपूर्वी, या कंपनीने गोरगरीब नागरिकांना शांतीनगर येथे घर बांधण्याकरिता जागा दिली होती, परंतु आजतागायत त्या जागेचे ड्रायव्हेशन (पट्टे) मिळाले नाहीत. या बाबत कंपनीने आश्वासन दिले होते की लवकरच सर्वे नंबर 167 येथील जमिनीचे पट्टे संबंधित नागरिकांच्या नावाने दिले जातील, परंतु 30 वर्षांनंतर देखील ते आश्वासन पूर्ण झाले नाही.
Demand for action against Lloyds Metals Company for land plots of citizens of Shantinagar
शांतीनगर येथील नागरिकांची स्थिती अत्यंत बिकट झाली आहे. कंपनीच्या या वर्तमनातल्या वर्तनामुळे या नागरिकांमध्ये असंतोष निर्माण झाला आहे. या लोकांना त्यांच्या घराच्या नावे असलेले टॅक्स (कर) चालू असतानाही, त्यांना आपली मालकी निश्चित करण्यासाठी अनिवार्य कागदपत्रे आणि जमिनीचे पट्टे मिळालेल्या नाहीत. तसेच, काही नागरिकांची खात्री आहे की, सर्वे नंबर 167 ह्या जागेचे ड्रायव्हिएशन होऊन पट्टे तयार झाले आहेत. तरीही कंपनीने नागरिकांना त्यांचे पट्टे व सातबारा देण्यास टाळाटाळ केली आहे.
सदरील समस्येचे समाधान न झाल्यास शांतीनगर येथील नागरिकांच्या एकजुटीने जनआंदोलन करण्याची तयारी आहे. कंपनीवर विश्वासघात केल्यामुळे, कंपनीच्या विरोधात कायदेशीर कारवाई केली जावी आणि शांतीनगरच्या गोरगरीब नागरिकांना तात्काळ त्यांच्या जमिनीचे पट्टे व सातबारा प्राप्त करून दिले जावे.
शांतीनगर येथील नागरिकांच्या या मागणीसाठी संबंधित प्रशासन, पालकमंत्री, आमदार, आणि अन्य संबंधित अधिकारी यांना पत्र पाठवण्यात आले आहे. कंपनीने त्वरित या प्रकरणात हस्तक्षेप करून नागरिकांच्या हक्कांचे संरक्षण करण्याची मागणी केली आहे.
0 comments:
Post a Comment