रत्नागिरी :-वाटद खंडाळा येथील श्री गोविंद भडसावळे यांचे रत्नागिरी दरम्यानच्या प्रवासात पैशाचे पाकीट व अनेक महत्वाची कागदपत्रे असलेले पाकीट नुकतेच बसमध्ये हरवले होते. ते पाकीट वरवडे येथील विद्यार्थीनी आर्या प्रविण गुरव हिला सापडले. ते तिने वाहक अमित सुपल यांना दिले.सदर पाकीट खंडाळा बसस्थानकात त्यांनी जमा केले. या दोघांच्या प्रामाणिक पणाबद्दल खंडाळा ग्रामस्थांनी या दोघांचा शाल, श्रीफळ, बुके व मिठाई देवून सत्कार केला.
यावेळी वाटद खंडाळ्याचे सरपंच अमित वाडकर, जेष्ठ सामाजिक कार्यकर्ते बाळशेठ जोग, पत्रकार विलासराव कोळेकर, उदय महाकाळ व सुनिल वनये, तसेच चालक आर. एम. सनदी, चालक किशोर जाधव, वाहतूक नियंत्रक आर. डी. चव्हाण, शेखर भडसावळे, प्रसाद पेढे, प्रकाश नाचरे, प्रविण मेस्त्री, रामदास खेडेकर, अजय मोघे, शरद महाडिक, अर्जुन कामत आदी ग्रामस्थ उपस्थित होते. यावेळी बाळशेठ जोग यांनी वाटद खंडाळा येथील वाहतूक नियंत्रक आर. डी. चव्हाण यांची प्रवाशांना मिळत असलेली उत्तम सेवा पाहता त्यांना किमान दोन वर्षे सेवेची मुदत वाढ मिळावी अशी अपेक्षा व्यक्त केली.तसेच अशा प्रामाणिक कर्मचारी व विद्यार्थीनीचे विशेष कौतुक केले.
0 comments:
Post a Comment