भद्रावती जावेद शेख:-
नुकतेच शालेय पोषण आहार कर्मचारी संघटना ( आयटक ) महाराष्ट्र राज्याच्या वतीने संपूर्ण महाराष्ट्रभर केंद्रीय संघटनेच्या आव्हानानुसार कॉम्रेड विनोद झोडगे पाटील राज्य महासचिव शालेय पोषण आहार कर्मचारी संघटना - कॉम्रेड राजू गैनवार माजी नगरसेवक व जिल्हा संघटक आयटक - कॉम्रेड नसरीन खा पठाण तालुका अध्यक्ष शालेय पोषण आहार कर्मचारी संघटना भद्रावती - कॉम्रेड शाया मोहितकर तालुका सचिव शालेय पोषण आहार कर्मचारी संघटना भद्रावती यांच्या नेतृत्वात आमदार करण देवतळे वरोरा - भद्रावती विधानसभा क्षेत्र जिल्हा चंद्रपूर व खासदार प्रतिभा धानोरकर चंद्रपूर - वणी - आर्णी लोकसभा क्षेत्र जिल्हा चंद्रपूर यांना देण्यात आले
School Nutrition Staff Association (SNATA) submits a memorandum to MLAs and MPs demanding
प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजने अंतर्गत गेल्या 20 ते 25 वर्षा पासून महाराष्ट्रात 17500 शालेय पोषण आहार स्वयंपाकी तथा मदतनीस कार्यरत आहे आपल्या राज्यात या कर्मचाऱ्यांना मासिक 2500 /- रुपये मानधन दिले जाते या तुटपुंज्या मानधनामध्ये या कर्मचाऱ्याकडून पोषण आहार तयार करण्यात येते आपण यावर तोडगा काढून आम्हाला न्याय द्यावा
प्रमुख मागण्या
कर्मचाऱ्याकडून पोषण आहार तयार करण्याबरोबर शाळा उघडणे शाळेची देखभाल करणे - स्वच्छता राखणे - जेवल्यानंतर विदयार्थ्यांचे ताट धुण्यापासून ते अनेक वेळेला शौचालय साफ करावे लागते इतके करूनही त्यांना महिण्यात फक्त 2500 /- रुपये मिळतात ते ही वेळेवर मिळत नाही तर पांडेचेरी राज्यात 14000 /- रुपये दरमहा व तामिळनाडू मध्ये 7800 /- रुपये दरमहा या प्रमाणे मानधनावर काम करावे लागते - त्याचप्रमाणे बाकीच्या राज्यामध्ये या शालेय पोषण आहार कर्मचाऱ्यांना मानधन दिले जाते त्याच धरतिवर आपल्या राज्यात सुद्धा कर्मचाऱ्यांना मानधनात त्वरित वाढ करण्याची तरतूद येणाऱ्या बजेट मध्ये करावी
निवेदन देताना कॉम्रेड अर्चना रासेकर - कॉम्रेड मंगला मस्के - कॉम्रेड लता देवगडे - कॉम्रेड सुनंदा येसोनकर - कॉम्रेड वैशाली अलार्म - कॉम्रेड रेखा टोंगे इत्यादी असंख्य पदाधीकारी कार्यकर्ते हजर होते
0 comments:
Post a Comment