राजूरा :-बालविद्या शिक्षण प्रसारक मंडळ राजुरा द्वारा संचालित आदर्श मराठी प्राथमिक विद्यामंदिर तथा आदर्श हायस्कूल राजूरा या शाळेत जागतीक महिला दिनानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.
Girls should express themselves for a prosperous and successful life.- Adv. Kunda Jenekar
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी बालविद्या शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष सतीश धोटे यांची उपस्थिती होती.तर प्रमूख अतिथी म्हणून सचिव भास्करराव येसेकर, संचालक मधुकरराव जानवे, अविनाश निवलकर, अल्का सदावर्ते, सत्कारमूर्ती म्हणून प्रा. मंगला माकोडे, महात्मा ज्योतिबा फुले कनिष्ठ महाविद्यालय राजुरा, प्रमुख मार्गदर्शक म्हणून ॲड. कुंदा जेणेकर, माजी सभापती, पं.स.राजुरा, नलिनी पिंगे, मुख्याध्यापिका आदर्श प्राथमिक, सारीपुत्र जांभूळकर, मुख्याध्यापक, आदर्श हायस्कूल, बादल बेले, राष्ट्रीय हरित सेना विभाग प्रमुख तथा पर्यवेक्षक आदींची प्रामुख्याने उपस्थिती होती. जागतिक महिला दिनानिमित्त महात्मा ज्योतीबा फुले विद्यालयाच्या सेवानिवृत्त शिक्षीका मंगला माकोडे यांचा सत्कार करण्यात आला. तसेच माता पालक व विद्यार्थी यांची युगल नृत्य स्पर्धा आयोजीत करण्यात आली होती. यावेळी विध्यार्थी व माता पालकांनी उस्पूर्तपणे सहभाग घेतला. या स्पर्धेत प्रथम क्रमांक परी वाघे, द्वितीय प्रियांशू वानखेडे, तृतीय स्वरा अगडे यांना सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले. यावेळी शालेय स्तरावरील पाककृती स्पर्धेत प्रथम क्रमांक ममता बाकेवार, द्वितीय सुरक्षा गुरनुले व सुवर्णा गिरसावळे तर तृतीय रुपाली निमकर व उमा जेनेकर यांना सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले. तांदूळ, नाचणी, बाजरी, ज्वारी , मका, मोट, चना, यापासून वेगवेगळे पदार्थ तयार करण्यात आले होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शिक्षिका सुनिता कोरडे व चैतण्या कवलकर, सानिका येरणे यांनी केले. प्रास्तावीक मुख्याध्यापिका नलिनी पिंगे यांनी तर आभार खुशी आदे विद्यार्थीनी यांनी मानले. स्काउट्स गाईड्स युनिट, राष्ट्रीय हरित सेना विध्यार्थी व शालेय विद्यार्थी करीता कायदेविषयक मार्गदर्शन घेण्यांत आले. यावेळी ॲड. कुंदा जेनेकर यांनी महिला - मुलींच्या बाबतीत असलेले कायदे, कलम याविषयी सविस्तरपणे माहिती दिली. मंगला माकोडे यांनी मुलगा मुलगी एकसमान असून यात अजिबात भेदभाव करू नये असे प्रतिपादन केले. अल्का सदावर्ते यांनी महिलांचा सन्मान करा. स्त्रि पुरुष हे दोन्ही घटक समाजात महत्वपूर्ण भूमिका बजावत असतात असे प्रतिपादन केले.
0 comments:
Post a Comment