भद्रावती तालुका प्रतिनिधी :- नुकतेच दि.५/३/२०२५ ला भद्रावती पंचायत समिती अंतर्गत तालुकास्तरीय पाककृती स्पर्धेचे आयोजन जि.प.उ.प्रा.शाळा, घुटकाळा येथे करण्यात आले होते. त्यात शाळा स्तराहुन झालेल्या स्पर्धेत विजयी ठरलेल्या पिएमश्री जि.प.उ.प्रा.शाळा, चंदनखेडा येथील माता पालक "सौ.सोनाली शामलहरी निखार" ह्या महिला पालक यांनी तांदुळ,तृणधान्य व कडधान्य या अन्न पदार्थाद्वारे विविध पाककृती व सुशोभिकरण तालुकास्तरावर करुन त्या स्पर्धेत "प्रथम क्रमांक" पटकविला.
"Chandankheda School Parent Mrs. Sonali Nikhar Awarded First Prize in Taluka Level Cooking Competition.
मा.सौ.सोनाली शामलहरी निखार ह्या शाळा व्यवस्थापन समिती पिएमश्री,जि.प.उ.प्रा. शाळा,चंदनखेडा च्या उपाध्यक्षा असून त्या शैक्षणिक व सामाजिक कार्यात अग्रेसर असतात.त्यांचे छोटे छोटे विविध गृहोध्योगी व्यवसाय असून ब्युटीपार्लर सह ब्युटीक व्यवसाय व पाककृती साठी परिसरात परिचित आहे.त्याबरोबरच नृत्य नाट्य,अभिनय यात त्या उत्तम रचियत्या आहेत.
जि.प.उ.प्रा.शाळा चंदनखेडा चे मु.अ.तसेच सर्व शिक्षकवृंद,विद्यार्थी व शाळा व्यवस्थापन समिती, सरपंच नयन जांभुळे,सौ.भारतीताई उरकांदे,उपसरपंच समस्त ग्रा.पं.सदस्य तथा ग्रामस्थांकडून त्यांचेवर अभिनंदनाचा वर्षाव केला जात आहे.
*सौ सोनाली शामलहरी निखार* यांचा गौरव शाळेच्या वतीने दि.८ मार्च ला आयोजित *जागतीक महिला दिन* सोहळ्यात *"कर्तृत्ववान महिला"* म्हणुन गौरवान्वित करण्यात येत आहे.
पुनश्च एकदा मा.सौ सोनालीताईं निखार यांचे खूप खूप अभिनंदन तसेच त्यांना जिल्हा स्तरीय स्पर्धेसाठी खूप खूप शुभेच्छा !!
0 comments:
Post a Comment