Ads

घुग्घुस येथे ऑनलाईन क्रिकेट बेटींग वर LCB ची रेड

चंद्रपुर  :-(Cricket Betting)  
दिनांक १७/०३/२०२५ रोजी स्थानिक गुन्हे शाखा, चंद्रपुर चे पथक मा. पोलीस अधिक्षक साहेब, चंद्रपुर यांचे आदेशान्वये चंद्रपुर जिल्हयात प्रोव्हीशन, जुगार रेड, सुगंधीत तंबाकु तसेच इतर अवैध धंदयावर कार्यवाही करण्यासाठी रवाना होवुन पोलीस स्टेशन, घुग्घुस परिसरात पेट्रोलींग करीत असतांना
Local Crime Branch, Chandrapur raids online cricket betting at Ghugghus
मुखबिर व्दारे खबर मिळाली की, म्हातारदेवी, घुग्घुस येथे राहणारा नामे अंशुल रामबाबु रॉय, वय-२६ वर्ष, रा. म्हातारदेवी, चिंत्तामणी कॉलेज जवळ, घुग्घुस, ता. जि. चंद्रपुर हा आपले राहते घरी मोबाईलवर ऑनलाईन पद्धतीने सध्या सुरू असलेली लिजेंड लिग भारत विरूध्द वेस्टइंडिज या क्रिकेट मॅचवर सट्टा (क्रिकेट बेटींग) घेत आहे अशा खबरे वरून स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने नमुद इसमांचे घरी छापा टाकुन त्याचेकडुन १) एक अॅपल आय फोन कंपनीचा मोबाईल किमंत १,००,०००/- रूपये तसेच २) आरोपीचे अंगझडतीत नगदी ३,००,०००/- रूपये व ३८ लाख रूपयाची ऑनलाईन जुगार आय.डी. सह एकूण ४२ लाख रूपयांचा मुद्देमाल जप्त करून नमुद आरोपी विरूध्द पोलीस स्टेशन घुग्घुस येथे महाराष्ट्र जुगार कायद्या अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला असुन पुढील तपास स्थानिक गुन्हे शाखा, चंद्रपुर करीत आहे.Betting on Cricket Matches (Cricket Betting)

सदर कार्यवाही मा. पोलीस अधिक्षक श्री. मुम्मका सुदर्शन साहेब चंद्रपुर, मा. अपर पोलीस अधिक्षक रिना जनबंधु मॅडम, यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक अमोल काचोरे यांचे नेतृत्वात पोउपनि विनोद भुरले, पोउपनि मधुकर सामलवार, पोउपनि सुनिल गौरकार, पोहवा ,सुभाष गोहोकार, पोहवा,सतिश अवथरे, पोहवा,रजनिकांत पुठ्ठवार, पोहवा ,दिपक डोंगरे, पोशि,प्रशांत नागोसे, पोशि,किशोर वाकाटे, पोशि/शशांक बदामवार, पोशि,अमोल सावे, चापोशि,मिलींद टेकाम सर्व स्थानिक गुन्हे शाखा, चंद्रपुर यांनी केली आहे.
Share on Whatsapp

About The Chandrapur Times

यह पोर्टल संपादक, मालिक, प्रकाशक राजेश सनमाहेन सोलापनद्वारा कार्यालय साप्ताहिक दि चंद्रपुर टाइम्स, आक्केवार वाडी, वॉर्ड नं. १, चंद्रपुर, से प्रकाशित किया गया है । प्रकाशित किसी भी लेखन सामग्री पर संपादक सहमत ही हो यह आवश्यक नही । प्रकाशित कि सी भी लेखनपर आपत्ती हाने पर उनका निस्तारण सूचना प्रौद्योगिकी (प्लेटफ़ॉर्म दिशानिर्देश और डिजिटल मीडिया आचार संहिता) विनियम 2021 के तहत किया जायेगा ।

0 comments:

Post a Comment