Ads

१७,००,०००/- कॅश चोरीचा मास्टरमाइंड चंद्रपुर शहर पोलीसांच्या जाळयात Mastermind of Rs 17,00,000/- cash theft caught by Chandrapur city police

चंद्रपुर :- दिनांक २०.०३.२०२५ रोजी साधारणतः दुपारी पाउने चार वाजताचे सुमारास हबीब शेख यांने पोलीस स्टेशन चंद्रपूर शहर येथे येवून तक्रार दिली की, भानापेठ वार्ड येथुन मालक नामे हबीब शेख हिंदुस्थान स्टिल व्यापार यांचे धंद्याचे पैसे असलेले १७,००,०००/- रु. कॅश त्यांचा नौकर नामे रफीक शेख हा भानापेठ वार्ड या ठिकाणांवरुन मोपेड गाडी ने घुटकाळा वार्ड चंद्रपूर या ठिकाणी घेवून जात असतांना साधारण ०३.०० वा. चे सुमारास आंबेकर लेआउट या ठिकाणी कोणीतरी अज्ञात इसमांनी त्याची गाडी थांबवून डोळयात मिरची पावडर टाकुण त्याचेवजळील बॅग मध्ये ठेवून असलेले १७,००,०००/-रु. रक्कम बॅग सह हिस्कावून घेवून पळुन गेले.
Mastermind of Rs 17,00,000/- cash theft caught by Chandrapur city police
अशा प्राप्त तक्रारीवरुन शहर पोलीस स्टेशनचा स्टाफ घटनास्थळी रवाना होउन घटनेची माहिती घेतली. घटनास्थळ शेजारील सिसिटीव्ही फुटेजची पाहणी करण्यात आली. तसेच त्याचे मालक हबीब शेख, अधिनस्त नौकर चाकर व इतर साक्षदार यांना विचारपुस करण्यात आली परंतु संशयीतांचा कुठलाही सुगावा लागला नाही. पोलीसांनी तपासाची चक्रे जलदगतीने फिरवली असता तांत्रीक विश्लेषण व परीस्थीती जन्य पुराव्याचे आधारे नौकर रफीक शेख यांनेच सदरचा गुन्हा केल्याचे निष्पण होत असल्याने त्यास ताब्यात घेवून सखोल चौकशी केली असता त्यांनी यातील नमुद रक्कम ही त्याचा भाऊ शफीक शेख रा. रहमतनगर चंद्रपूर यांचेकडे दिली. व स्वतः आणलेली मिरची पावडर आपले अंगावर ओतुन घेतली. सदर घटनेच्या अनुषंगाने पोलीस स्टेशन चंद्रपूर शहर येथे गुन्हा नोंद होण्याची प्रक्रिया सुरु असुन आरोपीकडून संपुर्ण मुददेमाल हस्तगत करण्यात आलेला आहे. सदरची कार्यवाही पोलीस अधिक्षक मुम्मूका सुदर्शन, अपर रिना जनबंधू, पोलीस उपअधिक्षक सुधाकर यादव यांचे मार्गदशनार्थ पोनि. प्रभावती टी. एकुरके, पोउपनि. संदिप बच्छिरे, व डि. बी. पथकातील सर्व पोलीस अंमलदार हे करीत आहेत.
Share on Whatsapp

About The Chandrapur Times

यह पोर्टल संपादक, मालिक, प्रकाशक राजेश सनमाहेन सोलापनद्वारा कार्यालय साप्ताहिक दि चंद्रपुर टाइम्स, आक्केवार वाडी, वॉर्ड नं. १, चंद्रपुर, से प्रकाशित किया गया है । प्रकाशित किसी भी लेखन सामग्री पर संपादक सहमत ही हो यह आवश्यक नही । प्रकाशित कि सी भी लेखनपर आपत्ती हाने पर उनका निस्तारण सूचना प्रौद्योगिकी (प्लेटफ़ॉर्म दिशानिर्देश और डिजिटल मीडिया आचार संहिता) विनियम 2021 के तहत किया जायेगा ।

0 comments:

Post a Comment