सादिक थैम वरोरा:महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळातर्गत निप्पॉन डेंड्रो प्रकल्पासाठी होणाऱ्या जमीन अधिग्रहणासंदर्भात आणि शेतकऱ्यांच्या समस्यांवर चर्चा करण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी तातडीने बैठक घ्यावी अशी मागणी आ. करण देवतळे यांनी विधानसभा सभागृहात बोलतांना केली. या प्रकल्पामुळे प्रभावित होणाऱ्या शेतकऱ्यांचे हित जपण्यासाठी आणि त्यांच्या प्रश्नांवर समाधानकारक तोडगा काढण्यासाठी ही बैठक आवश्यक असल्याचे मत यावेळी त्यांनी व्यक्त केले.
तसेच चंद्रपूर जिल्ह्यातील सुशिक्षित बेरोजगार अभियंत्यांना कामे मिळावीत अशी सुद्धा सभागृहात मागणी केली.
The demands of farmers whose land was acquired for the Nippon Dendro project should be fulfilled.
चंद्रपूर जिल्ह्यातील सुशिक्षित बेरोजगार अभियंत्यांना रोजगाराच्या संधी मिळाव्यात यासाठी ठोस उपाययोजना करण्याची मागणी करण्यात आली. शासन नियमांनुसार कंत्राटी कामांपैकी निश्चित कामे स्थानिक अभियंत्यांना मिळावीत, यासाठी तातडीने निर्णय घेण्याचे आवाहन करण्यात आले.
आज वीस मार्च रोज गुरुवारला सभागृहात चंद्रपूर जिल्ह्यातील सुशिक्षित बेरोजगार विद्युत अभियंत्यांना रोजगाराच्या संधी मिळाव्यात यासाठी ठोस उपाययोजना करण्याची मागणी त्यांनी केली . शासन नियमांनुसार कंत्राटी कामांपैकी निश्चित टक्के कामे स्थानिक विद्युत अभियंत्यांना मिळावीत, अशी मागणी यावेळी करण्यात आली.
*शेतकऱ्यांना वीज पुरवठा करा*
आज सभागृहात वरोरा-भद्रावती विधानसभा क्षेत्रातील शेतकऱ्यांनी मागील ५ वर्षांपासून डिमांड भरून असलेल्या वीज पुरवठ्याच्या पूर्ततेसाठी तातडीने कार्यवाही करावी, अशी मागणी केली. अद्यापही अनेक शेतकऱ्यांना योग्य वीज पुरवठा मिळालेला नसून, शेतीसाठी आवश्यक वीज वेळेवर उपलब्ध व्हावी यासाठी लवकरात लवकर निर्णय घ्यावा, असे सभागृहात मुद्दा उपस्थित करण्यात आला.
0 comments:
Post a Comment