Ads

एम.डी. (Mephedrone) ड्रॅग्स विकणारे दोन आरोपींना स्थानिक गुन्हे शाखेने केली अटक

चंद्रपुर :- दोघांना अमली पदार्थांची विक्री प्रकरणी अटक करण्यात आली आहे. मेफेड्रोन अमली पदार्थांची विक्री करण्यात येत असल्याचे स्थानिक गुन्हे शाखेच्या समजले. तेव्हा पोलिसांनी सापळा रचून दोघांना अटक केली. आरोपीं कडून 3,50,000/-रु मुद्देमाल जप्त केला
Two accused arrested by local crime branch for selling drugsM.D. (Mephedrone)
दिनांक २० मार्च, २०२५ रोजी स्थानिक गुन्हे शाखा, चंद्रपूर चे पथकाने गोपनिय माहितीचे आधारे पोलीस ठाणे चंद्रपूर शहर हद्दीतील महाकाली कॉलरी रेती बंकर जवळ नाकेबंदी करून दुचाकी होंडा अॅक्टीवा मोपेड गाडी व बुलेट मोटार सायकलवरुन येणारे इसमांना थांबवुन त्यांची पंचासमक्ष झडती घेतली असता आरोपी जुनेद आवेश शेख यांचे ताब्यात ५,५६ ग्रॅम एम. डी. ड्रग्स पावडर, तसेच आरोपी वृषभ धोंगडे याचे ताब्यात ३,५९ ग्रम एम.डी. ड्रग्स पावडर मिळुन आल्याने वरील दोन्ही आरोपी आणि पाहीजे असलेला आरोपी कालु पठाण असे तिघांविरुध्द पोलीस स्टेशन चंद्रपूर शहर येथे कलम ८ (क) २२ (ब) गुंगीकारक मनोव्यापारावर परिणाम करणारे पदार्थ अधिनियिम १९८५ प्रमाणे गुन्हा नोंदविण्यात आला असुन गुन्हयात एम.डी. ड्रग्स पावडर, अॅक्टीवा मोपेड, बुलेट मोटार सायकल व दोन नग मोबाईल असा एकुण ३,५०,०००/- रुपयाचा माल हस्तगत करण्यात आला आहे

सदरची कामगिरी पोलीस अधीक्षक श्री मुम्मका सुदर्शन, अपर पोलीस अधीक्षक रिना जनबंधु यांचे मार्गदर्शनात पोलीस निरीक्षक श्री अमोल काचारे, स्थानिक गुन्हे शाखा, चंद्रपूर यांचे नेतृत्वात सपोनि श्री दिपक कांक्रेडवार, सफौ स्वामीदास चालेकर, पोहवा किशोर वैरागडे, अजय बागेसर, प्रमोद कोटनाके, पोअं. गोपीनाथ नरोटे व चापोहवा दिनेश अराडे स्थानिक गुन्हे शाखा चंद्रपूर यांनी केली आहे.
Share on Whatsapp

About The Chandrapur Times

यह पोर्टल संपादक, मालिक, प्रकाशक राजेश सनमाहेन सोलापनद्वारा कार्यालय साप्ताहिक दि चंद्रपुर टाइम्स, आक्केवार वाडी, वॉर्ड नं. १, चंद्रपुर, से प्रकाशित किया गया है । प्रकाशित किसी भी लेखन सामग्री पर संपादक सहमत ही हो यह आवश्यक नही । प्रकाशित कि सी भी लेखनपर आपत्ती हाने पर उनका निस्तारण सूचना प्रौद्योगिकी (प्लेटफ़ॉर्म दिशानिर्देश और डिजिटल मीडिया आचार संहिता) विनियम 2021 के तहत किया जायेगा ।

0 comments:

Post a Comment