राजुरा :-
सामाजिक वनीकरण विभाग परिक्षेत्र राजुरा अंतर्गत जागतिक वन दिन व आदर्श हायस्कूल राजुरा येथील राष्ट्रीय हरित सेनेच्या विद्यार्थांनी प्रमाणपत्र वितरण सोहळा मध्य चांदा वनविभागाच्या वनोद्यानात संपन्न झाला.
Important role of trees in maintaining ecological balance.- B. C. Yele, Divisional Forest Officer
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी बी. सी. येळे, विभागीय वन अधिकारी, सामाजिक वनीकरण विभाग चंद्रपूर यांची उपस्थिती होती. तर विशेष अतिथी म्हणून चेतना मस्के, सहाय्यक वनसंरक्षक, सा.व.वी. चंद्रपूर, जी. आर. इंगळे, वनपरिक्षेत्र अधिकारी, सा.व.वी. राजुरा , सत्कारमूर्ती म्हणून विलास कुंदोजवार, सेवानिवृत्त वनपाल, सा.व.वी. परीक्षेत्र नागभिड तथा नागपूर विभाग अध्यक्ष, राष्ट्रीय वन्यजीव संवर्धन समिती (नेफडो), प्रमूख अतिथी म्हणून प्रशांत पाटील, प्राचार्य महात्मा ज्योतिबा फुले विद्यालय राजुरा, सुनिल मेश्राम, वनपाल, सा.व.वी.राजुरा, नलिनी पिंगे, मुख्याध्यापिका, आदर्श प्राथमिक, सारीपुत्र जांभूळकर, मुख्याध्यापक, आदर्श हायस्कूल , बादल बेले, राष्ट्रीय हरित सेना विभाग प्रमुख आदींची प्रामुख्याने उपस्थिती होती. कार्यक्रमाच्या सुरुवातीला महात्मा ज्योतिबा फुले विद्यालयाच्या राष्ट्रसंत तुकडोजी महाराज वसतिगृहातील मुलींच्या ब्यंड व लेझिम पथकाने मान्यवरांचे स्वागत केले. वनोद्यानातील कडुनिंबाच्या वृक्षाचे पूजन करण्यात आले. लोकजागृती कला पथक गोंडपिपरी चंद्रपूर यांनी जल, जंगल, जमीन, वन औषधी, वृक्षतोड, वनवा आदी विषयांवर पथनाट्य सादरीकरण केले. आदर्श शाळेतील विद्यार्थांनी चेहऱ्यावर विवीध फुलपाखरे, प्राणी, पक्षी, विवीध संदेश देणारी चित्र काढून सर्वांचे लक्ष वेधले. सामाजिक संदेश,पर्यावरण जनजागृती, वन्यप्राणी संवर्धन, वृक्षारोपण आदी विषयांवर पोस्टर प्रदर्शन व टाकाऊ पासुन टिकाऊ संकल्पनेतून कापडी पिशव्या तयार करून प्रदर्शनी ही सुद्धा लक्षवेधी ठरली. विलास कुंदोजवार यांचा सन्मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. मान्यवरांना शॉल, श्रीफळ, वृक्षकुंडी, भेटवस्तु देऊन सन्मानित करण्यात आले. आदर्श शाळेतील राष्ट्रिय हरीत सेनेच्या विद्यार्थांना प्रमाणपत्र वितरण करण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शिक्षिका जयश्री धोटे यांनी केले. प्रास्तावीक राष्ट्रिय हरीत सेना विभाग प्रमुख बादल बेले यांनी तर आभारप्रदर्शन वनपरिक्षेत्र अधिकारी जी. आर. इंगळे यांनी मानले. वृक्ष प्रतिज्ञा विकास बावणे यांनी वाचन केली. मोहनदास मेश्राम, राजबिंद्र डाहुले, सामाजिक वनीकरण परिक्षेत्र राजुरा, आदर्श शाळा, महात्मा ज्योतिबा फुले विद्यालय आदींचे सहकार्य लाभले. कार्यक्रमाचा शेवट उपस्थितांच्या स्नेहभोजनाने झाला.---------------------------------------------
वनांचा मानवी जीवनाशी असलेला सरळ संबंध जंगलावर असणारी प्राचीन औषध प्रणाली, आपली उपजीविका भागविणाऱ्या जमाती आणि जैवविविधता याबाबत लोकांमध्ये जागरुकता पसरविण्यासाठी आणि जंगल निर्माण, संवर्धन आणि संरक्षणाच्या उद्देशासाठी हा जागतीक वन दिन साजरा करण्यात येतो असे प्रतिपादन विभागीय वन अधिकारी येळे यांनी केले. तसेच आदर्श शाळेतील बादल बेले यांच्या मार्गर्शनाखाली सुरू असलेल्या राष्ट्रीय हरित सेनेच्या उपक्रम, कार्यक्रमांचे कौतुक केले.
बी. सी. येळे
विभागीय वन अधिकारी,
सा.व. वी.चंद्रपूर
-------------------------------------------
२०२५ या सत्रात जागतीक वन दिनाची संकल्पना "जंगल आणि अन्न" या थीमवर आधारित असून जंगलातील अनेक बाबींचा मानवी जीवनाशी थेट संबंध असतो त्यामुळें त्यांचें संवर्धन करण्याचे आवाहनही मस्के यांनी केले. आदर्श शाळेतील विद्यार्थांनी चेहऱ्यावर विवीध संदेश देणारी चित्र काढून सर्वांचे लक्ष वेधले तसेच या शाळेतून पर्यावरण संवर्धनाचे जनजागृती उपक्रम कार्यक्रम सातत्याने आयोजीत करण्यात येतात त्याबद्दल समाधान व्यक्त करीत अभिनंदन केले. जागतीक वन दिनाची संकल्पना समजावून दिली.
चेतना मस्के
सहाय्यक वनसंरक्षक,
सा.व.वी. चंद्रपूर
0 comments:
Post a Comment