मुंबई, दि. १६ (प्रतिनिधी): आजच्या पिढीला अमली पदार्थ्याच्या व्यसनापासून दूर ठेवणे हे गरजेचे आहे. अमली पदार्थ्यांच्या आड दडलेला नार्को दहशतवाद हा देशासाठी धोकादायक असल्याचे मत एनसीबी (नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो)(Narcotics Control Bureau) मुंबई युनिट चे माजी प्रमुख अधिकारी आणि आयआरएस अधिकारी समीर वानखेडे यांनी व्यक्त केले.IRS officer Sameer Wankhede
Narco-terrorism is dangerous for the country
परदेशातून चोरट्या मार्गाने अमली पदार्थ आणून त्याची विक्री केली जाते. अशा तस्करावर संबंधित यंत्रणा कारवाई करतात , कारवाई करताना अधिकाऱ्यांना अडचणींना कसे सामोरे जावे लागते त्याची माहिती वानखेडे यांनी दिली. दर्द से हम दर्द ट्रस्टच्या वतीने शनिवारी (ता. १५) चर्चगेटच्या बहाई सेंटरमध्ये कार्यक्रमाचे आयोजन केले होते. या कार्यक्रमाला विधी विषयाचा अभ्यास करणारे विद्यार्थी, नवोदित वकील हे मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रम मध्ये एड.शोभा चेट्टीयार यांनी वक्त्यांचा परिचय करून दिला. त्या कार्यक्रमाला आयआरएस अधिकारी समीर वानखेडे हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. तरुण पिढी ही नशेच्या आहारी जात असल्याचे चित्र आहे. पोलीस आणि संबंधित यंत्रणा या नशेबाज आणि तस्कर याच्यावर कडक कारवाई करतात. भारतात चोरट्या मार्गाने येणारे अमली पदार्थ ही चिंतेची बाब आहे. समुद्र, हवाई मार्गे तस्कर हे अमली पदार्थाची तस्करी करतात. प्रत्येक वेळी तस्कर हे त्याची गुन्ह्याची पद्धत बदलत असतात. अशा कॅरिअरवर केंद्रीय यंत्रणा या कारवाई करतात.
वानखेडे यांनी एनडीपीएस कायद्या बाबत उपस्थितांना मार्गदर्शन केले. एनडीपीएस कायद्यानुसार कोणती कलम लावली जातात. त्या कलमात काय शिक्षा आहे या बाबत देखील मार्गदर्शन केले. युरोपियन आणि आखाती देशातून येणारे कॅरिअर हे शरीरातून ड्रग कसे घेऊन येतात, ते ड्रग रुग्णालयात नेऊन कसे काढले जाते, पोटातून डॉक्टर ड्रग काढतात, कित्येकदा कॅरिअर हे सहकार्य करत नाही, अशावेळी काय अडचणी येतात याची माहिती देण्यात आली. तपास यंत्रणा या अमली पदार्थाचे व्यसन करणारा आणि अमली पदार्थाची तस्करी करणारा असा भेदभाव करत नाही. अमली पदार्थाचे व्यसन करणारा आणि तस्करी करणारा याच्यावर त्या त्या कलमाखाली कारवाई केली जाते. तसेच छोट्या वस्त्यांमध्ये व्यसन करणारे असो किंवा उच्चभ्रू सोसायटी मध्ये राहणारे असो त्याच्यावर कारवाई केलीच जाते. अमली पदार्थाचे व्यसन केल्याने आरोग्य धोक्यात येते. सध्या काही जण अमली पदार्थ व्यसनाबाबत गैर समज पसरवत आहेत. ते देखील थांबवणे गरजेचे असल्याचे मत वानखेडे यांनी व्यक्त केले. संस्थेच्या वतीने ऍड. सुनीता प्रकाश साळशिंगीकर- खंडाळे यांनी वानखेडे याचे स्मृतिचिन्ह देऊन सत्कार केला.
सूत्रसंचालन एड. विवेक निषाद यांनी केले तर आभार प्रदर्शन एडवोकेट नितीन हजारे यांनी केले. कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी गणेश नागरगोजे ओंकार पाटील श्रीराम चंदरकर मंगेश सौदालकर यांनी परिश्रम घेतले
0 comments:
Post a Comment