चंद्रपूर, दि.१५ – राज्याचे माजी वने, सांस्कृतिक कार्य व मत्स्यव्यवसाय मंत्री आमदार श्री. सुधीरभाऊ मुनगंटीवार कायमच चंद्रपूर जिल्ह्याच्या विकासासाठी झटत आले आहेत. प्रत्येकवेळी विविध विकासकामांसाठी त्यांनी महत्त्वपूर्ण निधी खेचून आणला आहे. आता माता महाकाली यात्रेकरूंसाठी मंजूर करण्यात आलेला २.९० कोटींचा निधी देखील त्यांच्या जनसेवेवरील निष्ठेचे प्रतीक आहे, या शब्दांत भाजपा महानगर जिल्हाध्यक्ष राहुल पावडे यांनी कृतज्ञता व्यक्त केली.
Sudhirbhau is a leader who constantly strives for the development of Chandrapur district - Rahul Pawde
चंद्रपूरचे आराध्य दैवत माता महाकालीच्या दर्शनासाठी राज्यभरातून येणाऱ्या यात्रेकरूंच्या सोयीसुविधांसाठी २ कोटी ९० लाख रुपयांचा मोठा निधी मंजूर करण्यात आला आहे. या निधीसाठी आ. श्री. सुधीरभाऊ मुनगंटीवार यांनी ठोस पाठपुरावा करत राज्य सरकारकडून निधी मंजूर करून घेतला. याबद्दल शनिवार, दि. १५ मार्चला भाजपा महानगरच्या वतीने आ. श्री. मुनगंटीवार यांचा भाजपा जनसंपर्क कार्यालय चंद्रपूर येथे सत्कार करण्यात आला. यावेळी सुरज पेदुलवार, रामपाल सिंग,सविता कांबळे,चांद सय्यद,मनोज पोतराजे,धनराज कोवे,रवी चहारे,धम्मप्रकाश भस्मे,संदीप आगलावे,दिनकर सोमलकर,सचिन कोतपल्लीवार,पुरुषोत्तम सहारे,रवी लोणकर,शीलाताई चव्हाण,अजय सरकार,चंद्रकला सोयाम,सुनील डोंगरे,प्रमोद शिरसागर आदिंची उपस्थिती होती.
माता महाकाली यात्रेकरूंना कोणत्याही अडचणींचा सामना करावा लागू नये, यासाठी भाजपा महानगरकडून आ. श्री. मुनगंटीवार यांना निवेदन देण्यात आले होते. या निवेदनाची दखल घेत आ. श्री. मुनगंटीवार यांनी अधिकाऱ्यांसह तातडीने झरपट नदीच्या पाहणीसाठी विशेष दौरा आयोजित केला. या पाहणीत संबंधित विभागांचे अधिकारी सहभागी झाले होते.
आ. श्री. मुनगंटीवार यांच्या पाठपुराव्याला यश
पाहणी दरम्यान यात्रेकरूंच्या सुविधांसाठी आवश्यक बाबी लक्षात घेण्यात आल्या. त्या संदर्भात आ. श्री. मुनगंटीवार यांनी राज्य सरकारकडे पाठपुरावा केला. मुख्यमंत्री श्री. देवेंद्रजी फडणवीस, उपमुख्यमंत्री श्री. एकनाथजी शिंदे आणि श्री. अजितदादा पवार यांना प्रत्यक्ष भेटत यात्रेकरूंच्या अडचणी लक्षात आणून दिल्या. आ. श्री. मुनगंटीवार यांनी सातत्यपूर्ण पाठपुरावा करत २ कोटी ९० लक्ष रुपये निधी मंजूर करून आणला.
कार्यकर्त्यांनी व्यक्त केली कृतज्ञता
या निधीमुळे यात्रेकरूंना आवश्यक असलेल्या सोयी-सुविधा उपलब्ध होणार आहेत. यासाठी आ. मुनगंटीवार यांचा भाजपा महानगराच्या पदाधिकाऱ्यांनी विशेष सत्कार केला. या सत्कार समारंभात भाजपा महानगर जिल्हाध्यक्ष राहुल पावडे आणि भाजपा पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी सहभाग घेत आ. श्री. मुनगंटीवार यांच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त केली.
0 comments:
Post a Comment