भद्रावती जावेद शेेेेख:-
प्रति एकरी दहा लाख रुपये अनुदान, प्रकल्पग्रस्त, कंपनी व एमआयडीसी मध्ये त्रिपक्षीय करार करणे व प्रकल्पग्रस्तांना नोकरीची हमी देणे या प्रमुख मागण्यांसाठी एक आठवड्यांपूर्वी मोर्चा काढून व निवेदन देऊनही शासनाने प्रकल्पग्रस्तांच्या मागण्याची दखल न घेतल्याने अखेर निप्पान प्रकल्पग्रस्त संघर्ष समितीतर्फे दिनांक 24 रोज सोमवरला सकाळी 11 वाजेपासून तहसील कार्यालयासमोर धरणे आंदोलनाला सुरुवात करण्यात आली आहे.
Nippon Dendro project-affected farmers' sit-in protest begins under the leadership of the Chief Minister's beloved sister
सदर धरणे आंदोलन हे पाच एप्रिल पर्यंत सुरू राहणार असून यादरम्यान रोज दहा ते सहा वाजेपर्यंत या आंदोलनात महिला, पुरुष प्रकल्पग्रस्त आपल्या परिवारासह क्रमाक्रमाने सहभागी होणार असल्याची माहिती संघर्ष समितीचे प्रसिद्धी प्रमुख लिमेश माणूसमारे यांनी दिली आहे. धरणे आंदोलनाच्या पहिल्या दिवशी नानेबाई माथनकर, योगिता बदखल, सुनीता बदखल, भाग्यश्री बदखल, शारदा खापणे, मनीषा सावणकर, शुभांगी चोपणे, बेबी मेश्राम, रिता बोडेकर, इंदू गौरकर, चंद्रकला बावणे आदी महिलांनी पुढाकार घेत सदर आंदोलनात आपला सहभाग नोंदविलेला आहे. सदर आंदोलनाची दखल शासनाने न घेतल्यास यापेक्षाही तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा प्रकल्पग्रस्त संघर्ष समितीतर्फे देण्यात आला आहे. सदर आंदोलनात निप्पान प्रकल्पग्रस्तांनी क्रमाक्रमाने सहभागी होऊन आपली ताकद दाखवावी असे आवाहन निप्पान प्रकल्पग्रस्त संघर्ष समितीतर्फे करण्यात आले आहे.या आधी सुद्धा आंदोलनं झाले असताना शेतकऱ्यांवर गुन्हे दाखल करण्यात आले तसेच वासुदेव ठाकरे यांना तडीपार करण्यात आले.यामुळे शेतकरी संताप व्यक्त करत असून शेतकऱ्यांना न्याय मिळेपर्यंत लढा सुरूच राहील असे सांगितले
0 comments:
Post a Comment