Ads

दरोडा सह मोटार सायकल चोरीचे ३ गुन्हे उघडकीस

चंद्रपुर :-Police station Rajura पोलीस ठाणे राजुरा हद्दीत दिनांक १६ मार्च २०२५ चे रात्रौ दरम्यान सास्ती कॉलरी आर.सी. ऑफीस येथे अज्ञात दरोडेखोरांनी WCL चे एक लाख रु. किंमतीचे केबल चोरुन नेल्याची तक्रार फिर्यादी सिध्दार्थ हर्षवर्धन तोडे यांनी दिल्यावरुन अपराध क्रमांक १२८/२०२५ कलम ३१२ भारतीय न्याय संहिता अन्वये गुन्हा नोंदविण्यात आला होता. Robbery
3 cases of motorcycle theft & Robbery uncovered
राजुरा पोलीसांनी सदर दरोडा गुन्हयाचा सखोल तपास करुन सदर दरोडयातील आरोपी(१) करण इंदुल निषाद, (२) दिपक उर्फ एटीएम अजय राजपुत, (३) लॉरेन्स उर्फ ईशु जार्ज दास, (४) सिराज संग्राम बहुरीया व दोन विधी संघर्ष बालक यांना ताब्यात घेवुन त्यांचे कडुन सदर दरोडा गुन्हयासह गडचिरोली व वर्धा जिल्हयातील मोटार सायकल चोरीचे ३ गुन्हे उघडकीस आणले आहे.

सदर आरोपीकडुन चोरलेले एक लाख रु. किं.चे केबल सह इतर ठिकाणाहुन चोरलेले दुचाकी वाहन (१) पल्सर NS 125 MH34-CG-0037 किं. ८०,०००/- रु. (२) पल्सर NS 200 MH12-QL-6391 किं. ५०,०००/- रु., (३) सुझुकी एक्सेस मोपेड क्र. MH32-AW-8378 किं. ६०,०००/- रु. असा एकुण २,९०,०००/- रुपयाची मालमत्ता जप्त करण्यात आली आहे.

सदरची कामगिरी परि. सहा. पोलीस अधीक्षक तथा ठाणे प्रभारी अधिकारी श्री अनिकेत हिरडे (भा.पो.से.) यांचे कुशल नेतृत्वात सपोनि श्री रमेश नन्नावरे, पोउपनि श्री सोरते, श्री पांडुरंग हाके, सफौ किशोर, पोहवा/अनुप डांगे, सचिन पडवे, कैलास आलाम, पोअं. महेश बोलगोडवार, योगेश पिदुरकर, शरद राठोड, शफीक शेख, अविनाश बांबोडे सर्व पोलीस ठाणे राजुरा यांनी केली आहे.
Share on Whatsapp

About The Chandrapur Times

यह पोर्टल संपादक, मालिक, प्रकाशक राजेश सनमाहेन सोलापनद्वारा कार्यालय साप्ताहिक दि चंद्रपुर टाइम्स, आक्केवार वाडी, वॉर्ड नं. १, चंद्रपुर, से प्रकाशित किया गया है । प्रकाशित किसी भी लेखन सामग्री पर संपादक सहमत ही हो यह आवश्यक नही । प्रकाशित कि सी भी लेखनपर आपत्ती हाने पर उनका निस्तारण सूचना प्रौद्योगिकी (प्लेटफ़ॉर्म दिशानिर्देश और डिजिटल मीडिया आचार संहिता) विनियम 2021 के तहत किया जायेगा ।

0 comments:

Post a Comment