Ads

बनावट सोने विक्री करून लोकांची फसवणूक करणारे आतंर राज्यीय टोळी गजाआड...

चंद्रपुर :-दिनांक २४/०३/२०२५ रोजी स्थानिक गुन्हे शाखा, चंद्रपुर चे पथक मा. पोलीस अधिक्षक साहेब, चंद्रपुर यांचे आदेशान्वये चंद्रपुर चंद्रपुर शहरात बनावटी सोना विक्री करून फसवणूक करणारी टोळी फिरत असल्याची गोपनिय बातमी मिळाले वरून सराफा लाईन येथील सोनार व ईतर व्यापारी यांना सतर्क करणे कामी तसेच नमुद इसमांचा चंद्रपुर शहरात शोध घेत असतांना छोटा बाजार परिसरातील जया कलेक्शन या दुकानाचे मालक राकेश मंधानी, रा. रामनगर चौक, चंद्रपुर यांना महिती देत असतांना त्यांनी सांगितले की,
Intra-state gang that cheats people by selling fake gold...
त्यांचेकडे काही वेळापुर्वी तिन इसम व एक महिला हे सोना विक्री करीता आले असुन त्यांनी सोन्याचे मणी दाखवुन त्यांचेकडे असलेली सोन्याची माळ आणणार आहे. त्यांचेकडे जवळपास एक किलोच्यावर सोने असल्याचे सांगुन २० लाख रूपये मध्ये विकायचे आहे असे सांगितले. त्यावरून पंचा समक्ष सापळा रचुन आरोपी नामे १) अतुल उर्फ मुखी बनाराम परमार, वय ३९ वर्ष, रा. नई आवादी, बोथला सराया, आगरा (उत्तरप्रदेश), २) शुत्रघ्न सिताराम सोलंकी, वय-४० वर्ष, रा. पश्चिमपुरी, दिपनगर, घर क्रमांक ए-७७, आगरा, उत्तरप्रदेश, ३) पुरन प्रेमचंद बघेल, वय-३८ वर्ष, रा. देवबलोदा, ता. पाटन, जि. दुर्ग, राज्या छत्तीसगड, ४) श्रीमती लक्ष्मी सेवाराम राठोड, वय-५५ वर्ष, रा. रेहीनाकी पुलीया, फैजीवाली गल्ली, फिरोजाबाद, ह. मु. नई आवादी, बोथला सराया, आगरा (उत्तरप्रदेश) यांचेकडुन १) ४ नग सोन्याचे मनी वजन १.५ मिली ग्रॅम किमंत १५,०००/- रू २) पिवळया धातुचे बनावटी मनीची माळ वजन १.३६१ किलो ग्रॅम (बनावटी नकली सोन्याची) किमंत १,०००/- रू, ३) दोन वेगवेगळया कंपनीचे मोबाईल किमंत २,०००/- असा एकुण असा एकुण १८,०००/- रूपयचा माल जप्त करून नमुद आरोपीतां विरुध्द पोलीस स्टेशन, चंद्रपुर शहर येथे फसवणुकीचा गुन्हा नोंद करण्यात येत आहे.

सदर कार्यवाही मा. पोलीस अधिक्षक श्री. मुम्मका सुदर्शन साहेब चंद्रपुर, मा. अपर पोलीस अधिक्षक रिना जनबंधु मॅडम, यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक अमोल काचोरे यांचे नेतृत्वात सपोनि दिपक कांक्रेडवार, पोउपनि सुनिल गोरकार, पोहवा/किशोर वैरागडे, पोहवा/दिपक डोंगरे, पोहवा/सतिश अवथरे, पोहवा/रजनिकांत पुठ्ठवार, मपोहवा/निराशा, पोशि/अमोल सावे सर्व स्थानिक गुन्हे शाखा, चंद्रपुर यांनी केली आहे.
Share on Whatsapp

About The Chandrapur Times

यह पोर्टल संपादक, मालिक, प्रकाशक राजेश सनमाहेन सोलापनद्वारा कार्यालय साप्ताहिक दि चंद्रपुर टाइम्स, आक्केवार वाडी, वॉर्ड नं. १, चंद्रपुर, से प्रकाशित किया गया है । प्रकाशित किसी भी लेखन सामग्री पर संपादक सहमत ही हो यह आवश्यक नही । प्रकाशित कि सी भी लेखनपर आपत्ती हाने पर उनका निस्तारण सूचना प्रौद्योगिकी (प्लेटफ़ॉर्म दिशानिर्देश और डिजिटल मीडिया आचार संहिता) विनियम 2021 के तहत किया जायेगा ।

0 comments:

Post a Comment