राजुरा: तालुक्यातील गोवरी येथील बादल गिरी यांच्या घरी सोमवारी रात्री ९ वाजताच्या सुमारास विषारी साप आढळल्याने ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण पसरले मात्र, सतर्क नागरिकांनी तात्काळ सर्पमित्रांना याची माहिती दिली. राजुरा येथील सर्पमित्र रोहन आकनुरवार,साहिल पेंदाम यांनी घटनास्थळी धाव घेतली आणि सुरक्षितरित्या सापाला पकडून जंगलात सोडून दिले.
Snake lovers save life of snake in Gowari
राजुरा तालुक्यातील गोवरी नागरिक बादल गिरी यांचे घरी सोमवारी रात्री ९ वाजताच्या सुमारास अचानक साप दिसला. त्यानंतर गिरी यांनी इतर गावकऱ्यांना याची माहिती दिली. नागरिकांनी घाबरून न जाता राजुरा येथील सर्पमित्रांशी संपर्क साधला. काही वेळातच राजुरा येथील सर्पमित्र रोहन आकनुरवार व साहिल पेंदाम घटनास्थळी पोहोचले.त्यांनी मोठ्या शिताफीने सावधगिरी बाळगत योग्य कौशल्य वापरून सापाला जिवंत पकडले. नंतर त्या सापाची योग्य ओळख पटवून नैसर्गिक अधिवासात सोडण्यात आले.सर्पमित्रांच्या या तत्परतेबद्दल गावकऱ्यांनी त्यांचे आभार मानले.यावेळी आकाश गिरी,तुफान गिरी,बंडू मशारकर,प्रभाकर पिंपळकर,विकास पिंपळकर रमेश सोनेकर,प्रकाश काळे,विनोद सिडाम,विनायक पिंपळकर,दैलेश तोडासे,केतन बोभाटे,प्रणय चिडे,जयंत उताणे,तुषार झाडे,संदीप उरकुडे,दिलीप बावणे व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
0 comments:
Post a Comment