Ads

आदिवासी कुटुंबाच्या जमिनीवर अतिक्रमण करण्याचा प्रयत्न संबंधित व्यक्तींविरुद्ध गुन्हा दाखल करा

चंद्रपूर :- तुकुम विभाग क्रमांक 1 येथील स्टेट बँक कॉलनी मधील रहिवासी पंचफुला मडावी कुलमेथे यांच्या जमिनीवर अतिक्रमण करण्याचा आणि त्यांच्या कुटुंबातील सदस्यांना धमकावून त्यांना त्यांच्याच घरातून आणि जमिनीतून हाकलून लावण्याचा प्रयत्न केला जात आहे.
Attempt to encroach on the land of a tribal family, file a case against the person concerned.
त्यामुळे हे कुटुंब भीतीच्या वातावरणात जगत आहे. या संदर्भात तक्रार करूनही पोलिस यंत्रणेकडून कसलीही कारवाई केली जात नाही. या संदर्भात, शिवसेना जिल्हाप्रमुख बंडू हजारे यांनी पत्रकार परिषदेद्वारे पोलिस प्रशासनाकडे आदिवासी कुटुंबाला धमकावणा_यांवर कारवाई करण्याची मागणी केली आहे.
दे.गो. तुकूम प्रभाग क्रमांक 1 स्टेट बैंक कालोनी मध्ये मागील 11 ते 12 ते अधिक वर्षापासून पंचफुला मडावी_कुलमेथे येथे निवासीत आहेत. ही जमीन वडिलोपार्जित असल्याने, अनेक लोकांची या जमिनीवर वाईट नजर आहे. गेल्या काही वर्षांपासून बल्लारपूरचे रहिवासी अभय सिंग कचवा, कमल सिंग कचवा, दिलीप वावरे, बादल खुशाल उराडे, तेजस दवे, मोना दवे यांची आदिवासी कुलमेथे कुटुंबाच्या जमिनीवर वाईट नजर आहे आणि ते त्यांना पैशाच्या जोरावर धमकी देऊन तेथून हाकलून लावण्याचा प्रयत्न करत आहेत. ज्यामुळे कुलमेथे कुटुंब नेहमीच भीतीच्या वातावरणत जगत असते. आदिवासी कुटुंबाला धमकावून त्यांची जमीन बळकावणा_यांवर कडक कारवाई करण्याची मागणी शिवसेना (शिंदे गट) जिल्हाप्रमुख बंडू हजारे यांनी पोलिस प्रशासनाकडे केली आहे.
----------------------------------------
Share on Whatsapp

About The Chandrapur Times

यह पोर्टल संपादक, मालिक, प्रकाशक राजेश सनमाहेन सोलापनद्वारा कार्यालय साप्ताहिक दि चंद्रपुर टाइम्स, आक्केवार वाडी, वॉर्ड नं. १, चंद्रपुर, से प्रकाशित किया गया है । प्रकाशित किसी भी लेखन सामग्री पर संपादक सहमत ही हो यह आवश्यक नही । प्रकाशित कि सी भी लेखनपर आपत्ती हाने पर उनका निस्तारण सूचना प्रौद्योगिकी (प्लेटफ़ॉर्म दिशानिर्देश और डिजिटल मीडिया आचार संहिता) विनियम 2021 के तहत किया जायेगा ।

0 comments:

Post a Comment