Ads

सिंदेवाही शहरातील राष्ट्रीय महामार्गावर मनमर्जीने केली जातात वाहने उभी

Vehicles are parked arbitrarily on the national highway in Sindewahi city.
(प्रशांत गेडाम)सिंदेवाही- सिंदेवाही शहरातून जाणाऱ्या चंद्रपूर-नागपूर महामार्गावरील रस्त्यावर आजुबाजूला मोठे मालवाहक ट्रक किंवा चारचाकी गाड्याउभ्या केल्या जातात यामुळे शहरातून येणाऱ्या दुचाकी वाहन तसेच पायदळ चालणाऱ्या नागरिकांनामोठा त्रास सहन करत आहेत व सदर त्यामुळे किरकोळ अपघात सुद्धा होत आहेत .पण याकडे मात्र स्थानिक पोलीस विभागाचे दुर्लक्ष होताना दिसुन येत आहे. स्थानिक छत्रपती शिवाजी महाराज चौकात व सिदेवाही - लोनवाही नगर पंचायत प्रशासनाच्यावतीने वाहनतळाची व्यवस्था करण्यात आली नसल्यामुळे या परिसरात ठिकठिकाणी मनमर्जीने वाहने उभी केली जात आहेत. बरेच हायवे रोडवरील हार्डवेअर दुकानदार इतर दुचाकी वाहन व पायदळ चालणारे प्रवासी नागरिकांची पर्वा न करता तास-तास रस्त्यावरच ट्रक ,मालवाहक, ट्रॅक्टर- ट्रॉली उभे करतात. हा प्रकार अपघाताला निमंत्रण देणारा असून, याकडे वाहतुक पोलिसांचेही दुर्लक्ष होत आहे. कर्तव्यावरील अनेक वाहतुक पोलिस चौकात उभे राहून वाहतूक सुरळीत करण्या पेक्षा गावाच्या बाहेरील रस्त्यावर उभे राहत असल्यामुळे दररोज शहरातील वाहतूक विस्कळीत होत असून, अनेक वेळा अपघात सुद्धा होतात. अपघातामुळे अनेक निष्पाप जीवाचा बळी गेला. मात्र याकडे जाणीव पूर्वक दुर्लक्ष होत असल्याची ओरड नागरिकांतून होत आहे. परिणामी, संबंधीत वरिष्ठ तसेच नगरपंचायततील मुख्याधिकारीी अधिकार्‍यांनी या समस्येकडे लक्ष देणे आता गरजेचे आहे.
Share on Whatsapp

About The Chandrapur Times

यह पोर्टल संपादक, मालिक, प्रकाशक राजेश सनमाहेन सोलापनद्वारा कार्यालय साप्ताहिक दि चंद्रपुर टाइम्स, आक्केवार वाडी, वॉर्ड नं. १, चंद्रपुर, से प्रकाशित किया गया है । प्रकाशित किसी भी लेखन सामग्री पर संपादक सहमत ही हो यह आवश्यक नही । प्रकाशित कि सी भी लेखनपर आपत्ती हाने पर उनका निस्तारण सूचना प्रौद्योगिकी (प्लेटफ़ॉर्म दिशानिर्देश और डिजिटल मीडिया आचार संहिता) विनियम 2021 के तहत किया जायेगा ।

0 comments:

Post a Comment