Ads

उमरेड मॅरेथॉन स्पर्धेत पी.आर. डी. स्पोर्ट्स ब्रम्हपुरी चे विदयार्थी चमकले

Students of PRD Sports Brahmapuri shine in Umred Marathon competition
ब्रम्हपुरी :-जागतिक आरोग्य दिनानिमित्त नगरपरिषद उमरेड व आई जगदंबा स्पोर्ट्स क्लब, उमरेड यांच्या संयुक्त विद्यमाने माझी वसुंधरा मॅरेथॉन स्पर्धा आज दिनांक ६ एप्रिल २०२५ रविवार ला सकाळी ७:०० वाजता देवरावजी इटणकर पब्लिक स्कूल ,उमरेड येथे आयोजित करण्यात आली होती या मॅरेथॉन स्पर्धेत मागील वर्षाची विजेती धावपटू कुमारी.आरुषी हेमंत फटिंग हिने विजयी परंपरा कायम राखत १० वर्षाआतील मुलींच्या १ कीमी. दौड स्पर्धेत
प्रथम क्रमांक पटकाविला तर १० वर्षाआतील मुलांच्या गटात १ किमी. दौड स्पर्धेत कु. अर्पित हिवराज सोमनकर याने प्रथम क्रमांक पटकावला तर कु.नक्ष महेश फटिंग याने पाचवा क्रमांक पटकाविला तसेच १२ वर्षाआतील मुलांच्या गटात २ किमी. दौड स्पर्धेत कु. जिशांत महेश फटिंग याने पाचवा क्रमांक पटकावला तर कु. मयुर रामकृष्ण ननावरे याने सहावा क्रमांक पटकाविला सर्व विजेत्या खेळाडूंना मेडल्स प्रमाणपत्र व रोख रक्क बक्षीस देण्यात आली विजेत्या खेळाडूंनी आपल्या विजयाचे श्रेय पालक व पी.आर.डी. स्पोर्ट्स, ब्रह्मपुरीचे संचालक व क्रिडा प्रशिक्षक राहुल जुआरे सर यांना दिले.
Share on Whatsapp

About The Chandrapur Times

यह पोर्टल संपादक, मालिक, प्रकाशक राजेश सनमाहेन सोलापनद्वारा कार्यालय साप्ताहिक दि चंद्रपुर टाइम्स, आक्केवार वाडी, वॉर्ड नं. १, चंद्रपुर, से प्रकाशित किया गया है । प्रकाशित किसी भी लेखन सामग्री पर संपादक सहमत ही हो यह आवश्यक नही । प्रकाशित कि सी भी लेखनपर आपत्ती हाने पर उनका निस्तारण सूचना प्रौद्योगिकी (प्लेटफ़ॉर्म दिशानिर्देश और डिजिटल मीडिया आचार संहिता) विनियम 2021 के तहत किया जायेगा ।

0 comments:

Post a Comment