Dr. A. K. Mahatale appointed as Executive Principal of Janata College Chandrapur
विद्यार्थी प्रिय व शिस्तप्रिय अशी ख्याती असलेले डॉ. महातळे यांना 30 वर्षांहून अधिकचा शैक्षणिक अनुभव असून त्यांच्या मार्गदर्शनात अनेक विद्यार्थ्यांनी संशोधन पूर्ण करून पीएचडी प्राप्त केली आहे. ते इंडियन इकॉनॉमिक्स असोसिएशनचे आजीवन सदस्य देखील आहेत. राज्यातील व राज्याबाहेरील अनेक विद्यापीठांमध्ये ते अर्थशास्त्र विषयात पी.एच.डी एक्स्टर्नल सुद्धा आहेत. त्यांचे राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर अनेक शोधनिबंध देखील प्रकाशित झालेले आहेत. डॉ. महातळे यांच्या मार्गदर्शनात राज्यस्तरीय व विद्यापीठ स्तरीय चर्चासत्र घेण्यात आलेले आहेत. उत्कृष्ट परंपरा असलेल्या चंद्रपूर गडचिरोली या जुळ्या जिल्ह्यातील पहिले महाविद्यालय असलेल्या जनता महाविद्यालयाला वैभव प्राप्त करून देत नव्या शिखरावर नेण्याचे मानस यावेळी त्यांनी व्यक्त केले. यावेळी पदभार स्वीकारण्याचा कार्यक्रम घेण्यात आला. यावेळी निवृत्त प्राचार्य डॉ. एम. सुभाष, प्रा. डॉ. पी. जे. खिंची, प्रा. डॉ. एफ. डब्ल्यू. निरंजने,प्रा. डॉ. किशोर ठाकरे, प्रा. डॉ. पी. व्ही. मेश्राम, प्रबंधक डी. यु. अडबाले आदी उपस्थित होते.जनता महाविद्यालय चंद्रपूर च्या कार्यकारी प्राचार्य पदी डॉ.ए. के.महातळे यांची नियुक्ती
चंद्रपूर :-चांदा शिक्षण प्रसारक मंडळ चंद्रपूर द्वारा संचालित स्थानिक जनता महाविद्यालय चंद्रपूर येथे संस्थेचे सचिव डॉ. अशोक जीवतोडे यांच्या मार्गदर्शनात कार्यकारी प्राचार्य या पदावर महाविद्यालयाचे अर्थशास्त्र विभाग प्रमुख डॉ.ए. के.महातळे यांची नियुक्ती झाली आहे.
0 comments:
Post a Comment