चंद्रपुर :-वनसडी वनपरिक्षेत्रांतर्गत निजामगोंदी येथील शेतातील विहिरीत पडलेल्या बिबट्याला ६ तासांच्या प्रयत्नानंतर वन कर्मचाऱ्यांनी सुखरूप बाहेर काढले.
Forest officials saved the life of a leopard that fell into a well
मध्यचांदा वनविभागाच्या वनसडी वन परिक्षेत्रांतर्गत निजामगोंदी निश्चित वनपरिक्षेत्राला लागून असलेल्या शेतातील विहिरीत बिबट्या पडल्याची माहिती गस्तीवर असलेल्या वनसडी येथील वन कर्मचाऱ्यांना मिळाली. माहिती मिळताच वन परिक्षेत्र अधिकारी, क्षेत्र सहाय्यक, वनरक्षक व वनमजूर घटनास्थळी दाखल झाले. रात्रीची वेळ असल्याने बिबट्याला बाहेर काढणे धोक्याचे होते. असे असले तरी 6 तासांच्या अथक प्रयत्नानंतर रात्री 1 वाजता बिबट्याला सिदी तळातून बाहेर काढण्यात आले. बिबट्या विहिरीतून बाहेर येताच जंगलाच्या दिशेने पळून गेल्याने सर्वांनी सुटकेचा नि:श्वास सोडला.leopard rescued from well
ही रेस्क्यू ऑपरेशन वनसंरक्षक श्वेता बोड्डू, वन परिक्षेत्र अधिकारी एन.जी.केळवडकर, वनपरिक्षेत्र सहाय्यक दिनेश चामलवार, कोरपना क्षेत्र सहाय्यक यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली.
एन.आर.धात्रक, वनरक्षक आर.जी.कुंघटकर, करिश्मा पाचभाई, एस.डी.तांदुलकर, साई मेश्राम, निखिल गेडाम, डी.जी. मडावी, व्यंकती जेल्लेवाड, एन.आर.गेडाम, अनिल कोल्हे आदी वनकर्मचारी, अग्निशमन दलाचे कर्मचारी व ग्रामस्थांनी यशस्वीपणे काम केले.
0 comments:
Post a Comment